esakal | पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याचा एक्सलंन्स इन होलिस्टिक हेल्थकेअर पुरस्काराने गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

एक्सलंन्स इन होलिस्टिक हेल्थकेअर पुरस्काराने गौरव

पुणे : डॉक्टर दाम्पत्याचा एक्सलंन्स इन होलिस्टिक हेल्थकेअर पुरस्काराने गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील डॉ. गणेश आणि डॉ. अर्चना आव्हाड या डॉक्टर दाम्पत्यास आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एक्सलंन्स इन होलिस्टिक हेल्थकेअर या पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील आरोग्य संस्था व डॉक्टरांच्या कार्याचा दरवर्षी "आयकॉनिक हेल्थकेअर समिटतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा: लोणावळा : स्थानकाजवळ मालगाडीचे डब्बे घसरले, दहा दिवसांत दुसरी घटना

सध्याच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार, मधुमेह, स्थूलता, थाईरॉईड, लिव्हर, कर्करोग, वंध्यत्व, त्वचा, केसांच्या समस्या आदी विषयांवर सातत्याने संशोधन करण्याचे काम मागील दीड दशकापासून हे दाम्पत्य करत आहे.आतापर्यंत त्यांनी जगातील विविध देशांमध्ये शोध निबंध सादर केले आहेत.युरोप, लंडन,सिंगापूर, बेल्जियम,जर्मनी,मलेशिया आदी देशांमध्ये मधुमेह, स्थुलता, थायरॅाइड या विषयांवरील संमेलनात त्यांनी सहभाग घेतला आहे.

डॉ. आव्हाड हे भारत सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल या नोंदणीकृत नीतिमत्ता नियामक समितीवर मागील दहा वर्षांपासून काम करत आहेत. ते पुण्यातील लोटस हेल्थकेअर क्लिनिकचे प्रमुख आहेत.

loading image
go to top