डॉक्‍टरांना मिळाला ई-सल्लागार

डॉक्‍टरांना मिळाला ई-सल्लागार

वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील माहिती पुरविणारे ‘हाय डॉक’ स्टार्टअप
पुणे - रुग्णांवर उपचार करीत असताना आम्हाला आवश्‍यक असलेली अद्ययावत माहिती एका ठिकाणी मिळणे हे अवघड काम. ऑपरेशनपूर्वी काही अडचण आली किंवा वरिष्ठांचा सल्ला हवा असेल तर, त्यात खूप वेळ जातो. नवीन तंत्रज्ञानाबाबतदेखील तीच अडचण होती. मात्र ‘हाय डॉक’ने अगदी चुटकीसरशी या अडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे प्रॅक्‍टिस करताना सर्व माहिती अगदी सहज उपलब्ध होत असल्याचा अनुभव डॉ. अश्‍विनी अवशट्टे यांनी व्यक्‍त केला.  

सध्या ज्या प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आजार येत आहेत. त्याप्रमाणे त्यावर उपचार करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञानदेखील विकसित होत आहे. हे तंत्रज्ञान तयार करण्यापूर्वी झालेले संशोधन सहजासहजी डॉक्‍टरांपर्यंत पोचत नाही. तसेच एखाद्या आजाराबाबत नुकतेच झालेले संशोधन कोणते आहे? शस्त्रक्रियेसाठी कोणती नवीन साधने व औषधोपचार आली आहेत? रुग्णांवर नेमक्‍या कशा पद्धतीने उपचार करावे, याचे सेकंड ओपिनियन घेणे, या सर्वांची माहिती डॉक्‍टरांना एका ठिकाणी खात्रीशीर सूत्रांकडून मिळणे अवघड असते. त्यामुळे वेळेत आणि योग्य उपचार करण्यास उशीर होऊ शकतो. डॉक्‍टरांची हीच अडचण लक्षात घेऊन ती सोडविण्यासाठी डॉ. राजेश गादिया आणि वरुण गादिया यांनी पुण्यात २०१९ मध्ये ‘हाय डॉक’ हे स्टार्टअप सुरू केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुटलेल्या समस्या

  • पंधरा मिनिटांत सेकंड ओपिनियन घेणे शक्‍य
  • मेडिकलच्या विद्यार्थ्यांपासून सिनिअर डॉक्‍टरांना मार्गदर्शक  
  • वैद्यकीय संशोधन एकाच ठिकाणी 
  • फार्मा कंपनीच्या नवीन उत्पादनांची माहिती 
  • केस स्टडीजमुळे उपचारांना दिशा 
  • मेडिकल कॉन्फरन्सचे निष्कर्ष सोप्या पद्धतीने मिळते 

हाय डॉकची व्याप्ती

  • सहभागी डॉक्‍टर ४ लाख ८० हजार
  • मेडिकल केसेस १ लाख +
  • केसेसचे सादरीकरण २ लाख ५०
  • किती देशांतील डॉक्‍टर १६०
  • सेकंड ओपोनियनचा वेळ एका सेकंदात १ हजार मते

उपचार पद्धतीत सुधारणा  
रुग्णावर प्रयोग करायचा असल्यास त्यात त्याचा जीवदेखील जाऊ शकतो. मात्र उपचाराचे परिमाण आणि त्याच्या पद्धतीबाबत आधीच अभ्यास झाला असेल तर अचूक उपचार देणे शक्‍य होते. ‘हाय डॉक’च्या प्लॅटफार्ममुळे असेच अनेक सकारात्मक बदल आरोग्य क्षेत्रात होत आहेत. तसेच डॉक्‍टरांना संशोधनाची माहिती शोधण्यासाठी मोठा वेळ खर्च करावा लागत नाही. तो वेळ ते रुग्णसेवेला देऊ शकतात.  

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com