चांदणी चौकाचा वर्षात होणार कायापालट; नितीन गडकरींचे आदेश

Dont worry about the citizens finish the work of the flyover throughout the year Nitin Gadkari order
Dont worry about the citizens finish the work of the flyover throughout the year Nitin Gadkari order

पुणे : जमीन अधिग्रहणामुळे चांदणी चौकातील उड्डाणपुलास दीड वर्ष उशीर झालेला असला तरी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका, पोलिस यांच्या मदतीने दिवसरात्र काम करा आणि वर्षभराच्या आत काम पूर्ण करा असे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह (एनएचएआय) ठेकेदाराला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

‘एनएएचआय’ आणि पुणे महापालिकेतर्फे चांदणी चौकात उड्डाणपूल उभारला जात आहे, त्याचे भूमीपूजन होऊन देखील अद्याप कामास गती आलेली नाही. या कामाची नितीन गडकरी यांनी पहाणी केली, त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबैठकीत संरक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या अडवणूकीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सभागृहनेते गणेश बिडकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पत्रकार परिषदेत बोलताना गडकरी म्हणाले, ‘‘हा उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी ९३० दिवसांचा कालावधी होता. हे काम २६ आॅगस्ट २०२१ ला पूर्ण होणे अपेक्षीत होते. पण आता एवढ्या कमी कालावधीत हे काम होणे शक्य नाही. तीन दिवसांपूर्वीच ठेकेदाराच्या ताब्यात जागा गेली आहे. ३१ जानेवारी २०२३ मध्ये हा उड्डाणपूल होईल असे सांगितले जात आहे. एवढा उशीर करून नागरिकांना त्रास देणे योग्य नाही. त्यामुळे आजपासून एका वर्षाच्या आता उड्डाणपुलाचे पूर्ण करा असे आदेश एनएचएआय, महापालिका, पोलिस यांना दिल्या आहेत.

निकृष्ट काम केल्यास उखडून टाकणे
नागपूरमधील उड्डाणपुलाचे काम मिळालेल्या कंपनीलाच चांदणी चौकाच्या कामाचा ठेका मिळाला आहे. नागपूरमध्ये उड्डाणपुलांच्या ज्वाईंटचे काम निकृष्ट केले, तसे काम इथे केले तर मी सगळेच तुमचे काम उखडून टाकून देईन मला असले चालणार नाही. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घटनापूर्वी मी त्याची तपासणी करणार, माझ्या पोटातील पाणी देखील हलले नाही पाणी पाहिजे. आम्ही मालपाणी वाले लोक नाहीत, त्यामुळे काम व्यवस्थितच पाहिजे. महापालिका, वाहतूक पोलिसांची मदत घेऊन लवकर काम संपवा अशा शब्दात गडकरी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना बैठकीत सुनावले.

जमीन अधिग्रहणात संरक्षण विभागाचा अडसर

उड्डाणपुलाच्या कामात एनडीएची जागा जाणार आहे, त्याबदल्यात त्यांना १७ कोटी रुपये द्यायचे आहेत, पण जागाच ताब्यात येत नसल्याने कामास उशीर होत असल्याचे बैठकीत समोर आले. त्यावेळी गडकरी यांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी आम्ही जमीन देण्यास तयार आहोत असे सांगितले. गडकरी म्हणाले, यापूर्वी दोन वेळा आपल्यासोबत बैठक झाली आहे. पण संरक्षण मंत्रालयातील सचिव आणि त्यांचे दोन नंदी अर्धवट आदेश काढत असल्याने व डबल मोबदला मागत असल्याने अडचणी येत आहेत. तुम्हाला पैसै हवे असतील तर पैसे देतो किंवा बांधकाम करून पाहिजे असेल तर ते देखील देऊ, पण दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत, असे सांगितले. तसेच दिल्लीतील अधिकाऱ्यांसोबत बैठक लावा अशा सूचनाही गडकरी यांनी दिल्या.

लसीकरण केंद्रावर पोहोचले आदर पूनावाला; ट्विटरवरून दिली माहिती

निवडणुकीमुळे लक्ष
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम आॅगस्ट २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते, पण आता ठेकेदाराने जानेवारी २०२३ ची मुदत दिली आहे. पण काही करून हे काम वर्षभरात पूर्ण करा असे आदेश आज गडकरी यांनी दिले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. त्यामुळेच हा प्रकल्प निवडणुकीपूर्वी केला तर नागिरकांना काम दाखविता येणार आहे. त्यामुळेच महापौर मोहोळ यांच्या मागणीनुसार ही बैठक तातडीने आयोजित करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com