esakal | धारावीतल्या रुग्णांना दिली आयुर्वेदिक औषधे; रिझर्ल्ट पाहा!

बोलून बातमी शोधा

Balaji-Tambe

चीनमधील या महासाथीच्या बातम्या येत असतानाच यावर आयुर्वेद उपयुक्त ठरेल असे माझ्या मनात आले. त्यानुसार संशोधन सुरू केले. आयुर्वेदिक लक्षणांवर आधारित अशी औषधे तयार करताना जागतिक पातळीवर प्रत्येक वनस्पतीचे झालेले आधुनिक संशोधनही आम्ही आधाराला घेतले. ‘सॅन अमृत’मध्ये तेरा वनस्पतींचे घटक आहे. तर ‘फॉर्म्युला k-2’मध्ये अकरा द्रव्ये आहेत. फुप्फुसाचा व श्वसनविकाराचा त्रास होऊ नये आणि रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यादृष्टीने ही औषधे तयार करण्यात आली आहेत. या औषधांच्या वापराला ‘अन्न व औषधी प्रशासना’ने मान्यता दिलेली आहे. हे औषध बाजारात उपलब्ध करण्याआधी कार्ला येथील ‘आत्मसंतुलन ग्राम’मधील रहिवासी, रुग्ण, मित्रपरिवार, कर्मचारी अशा सुमारे अडीचशे जणांना दुपारच्या चहा ऐवजी हा काढा दिला जात होता. त्यांची सर्दी-कफ-खोकला, दमा ही लक्षणेही या औषधाने गेलेली आढळली होती. लंडन येथील एक जण येथे उपचारांसाठी आला होता. त्याच्या पत्नीला कोरोनाबाधा झाल्याने लंडनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला ही औषधे दिल्यानंतर तिची बरे होण्याची प्रक्रिया वाढली. जर्मनीत फ्रँकफर्ट इनोव्हेशन सेंटरकडेही ही औषधे पाठवण्यात आली आहेत.
- ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. श्री बालाजी तांबे

धारावीतल्या रुग्णांना दिली आयुर्वेदिक औषधे; रिझर्ल्ट पाहा!
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘संतुलन आयुर्वेद’ची ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ औषधे गुणकारी
पुणे - ‘संतुलन आयुर्वेद’ची ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ ही दोन्ही औषधे कोरोनाची बाधा होण्यापासून दूर ठेवत असल्याचा आणि आधीच बाधा झालेली असल्यास लवकर बरे होण्यासाठी साह्यकारी ठरत असल्याचा अनुभव धारावीतील रुग्णांवर उपचार करताना आला, असे डॉ. कैलास गौड यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘धारावी ॲक्शन ग्रुप’ त्या परिसरातील कोरोनाग्रस्तांसाठी कार्यरत आहे. या संस्थेसाठी डॉ. गौड धारावीत कोरोनाग्रस्तांवर उपचार करीत आहेत. तेथील दोन कोरोनाबाधितांवर व चार रुग्णांच्या कुटुंबावर उपचार करताना त्यांनी ‘संतुलन आयुर्वेद’ची ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ या आयुर्वेदिक औषधांचा वापर केला होता. या औषधांचा गुण आलेला दिसताच ते या औषधांचा नियमित वापर करू लागले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एका सतरा वर्षांच्या रुग्णावर (गोपनियतेच्या नियमामुळे रुग्णांची नावे दिलेली नाहीत) एक मेपासून डॉ. गौड उपचार करीत होते. त्याला १२ मे रोजी कोरोनाबाधा झाल्याचे तपासणीत आढळले. त्याला घरी राहून उपचार घ्यायचे असल्याने डॉ. गौड यांनी  ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ ही औषधे दिली. तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पंधरा माणसांनाही ही औषधे दिली. त्यामुळे रुग्ण तर बरा झालाच, पण त्याच्या घरातील किंवा संपर्कात आलेले कोणीही आजारी पडले नाही. 

हवेली तालुक्यातील नवीन प्रतिबंधित क्षेत्र पाहा कुठले आहेत...

दुसरा तेवीस वर्षीय रुग्ण विषमज्वराची लक्षणे दिसत असल्याने उपचारांसाठी आला होता. त्याला विषमज्वरावरील औषधांबरोबरच ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ ही औषधे देण्यात आली. पण दरम्यान त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे लक्षात आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात ही औषधे देता आली नव्हती. पण अगोदर पाच दिवस ही औषधे देण्यात आल्याने प्रतिकारशक्ती वाढून रुग्ण बरा होऊन घरी परतला. त्याच्या घरातील चार नातेवाइकांना दहा दिवस ही औषधे देण्यात आली. बाधित रुग्णाबरोबर असूनही त्यांना बाधा झाली नाही. 

...रूग्णालयांसाठी विभागीय आयुक्‍तांचे नविन आदेश; काय आहेत वाचा सविस्तर

साठ वर्षांच्या महिलेला विषमज्वराची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीत कोरोनाबाधा झाल्याचे आढळले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व जवळच्या अशा सतरा कुटुंबीयांना ‘संतुलन आयुर्वेद’ची दोऩ्ही औषधे दिली. तसेच, कोरोनाचे निदान झालेल्या एका अडुसष्ट वर्षाच्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या पतीला व मुलाला ‘संतुलन आयुर्वेद’ची औषधे देण्यात आली. ही औषधे घेणारे १९ जण कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात येऊनही कोरोनाबाधेपासून दूर राहू शकले, अशी माहिती डॉ. गौड यांनी दिली.

आमदार रोहित पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू कोरडे यांच्याद्वारे ‘संतुलन आयुर्वेद’ची ‘सॅन अमृत’ व ‘फॉर्म्युला k-2’ ही औषधे आमच्यापर्यंत पोचवली. ही औषधे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याने महासाथीत लोकांचे स्वास्थ्य टिकवणारी आहेत, हे सिद्ध होते. कोरोना रुग्णावर या औषधांचा उपयोग करण्यास रुग्णालयांना परवानगी दिली तर साथनिवारणासाठी उपयुक्त ठरेल.
- डॉ. कैलास गौड