एम-परिवहन ॲपमधून डाऊनलोड करा लायसन्स, आरसी

Digilocker
Digilocker

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या एम-परिवहन मोबाईल ॲपद्वारे इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपात कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने सर्व नागरिकांसाठी हे मोबाईल ॲप विकसित केले असून, ते गुगल प्ले-स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • डिजीलॉकर किंवा एम-परिवहन येथे उपलब्ध असलेले इलेक्‍ट्रॉनिक रेकॉर्ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या तरतुदींनुसार मूळ कागदपत्रांच्या तुलनेत कायदेशीर असल्याचे मानले जाते.
  • हे दोन्ही ॲप ॲन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध.
  • हे ॲप विनामूल्य असून त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. 
  • यातील दस्तऐवजाचे आभासी स्वरूप मूळ दस्तऐवजाइतकेच वैध आहे.
  • नव्या नियमांनुसार, वाहनचालक किंवा मालकाद्वारे पुरविलेला तपशील पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने मान्य केल्यास, कोणत्याही मूळ कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही. 
  • आवश्‍यकता भासल्यास मूळ कागदपत्रांच्या जप्तीच्या नोंदीसाठी परिवहन व पोलिस विभागासाठी असलेल्या ई-चलन या मोबाईल ॲपमध्ये सुविधा आहे.

व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स (डी.एल.)

  • साइन-इन केल्यानंतर ॲपमध्ये दर्शविलेल्या डीएल बटणावर क्‍लिक करा. यानंतर सर्च बारमध्ये तुमचा डीएल क्रमांक टाकून शोधा 
  • शोध बटणावर क्‍लिक करताच डीएल क्रमांकाशी संबंधित माहिती तुमच्यासमोर येईल.
  • खालच्या बाजूस तुम्हाला व्हर्च्युअल डीएल तयार करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्‍लिक करून तुम्हाला आभासी स्वरूपात डीएल मिळेल. 
  • आपली इच्छा असल्यास आपण ॲड-टू- माय डॅशबोर्डवर क्‍लिक करून व्हर्च्युअल डीएल आपल्या खात्यात जोडू शकता.

व्हर्च्युअल ‘आरसी’ डाउनलोड कशी कराल ?

  • एम-परिवहन ॲप डाउनलोड करा व उघडा.
  • ॲपच्या डाव्या बाजूला असलेल्या तीन मेनू रेषांवर क्‍लिक करा.
  • तुम्हाला वरच्या बाजूला साइन-इनचा पर्याय मिळेल.
  • साइन-इनवर क्‍लिक करताच मोबाईल क्रमांक विचारला जाईल. 
  • मोबाईल नंबर टाकून कंटीन्यू बटणावर क्‍लिक केल्यावर सहा अंकी ओटीपी मिळेल. तो टाकून साइन इन प्रक्रिया पूर्ण करा.
  • साइन-इन केल्यानंतर ॲपमध्ये दर्शविलेल्या आरसी बटणावर क्‍लिक करा. 
  • यानंतर सर्च बारमध्ये तुमचा अथवा कोणताही वाहन क्रमांक टाकून शोधा.
  • शोध बटणावर क्‍लिक करताच नोंदणी क्रमांकाशी संबंधित डेटा समोर येईल. 
  • खालच्या बाजूस तुम्हाला व्हर्च्युअल आरसी तयार करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्‍लिक करून तुम्हाला आभासी स्वरूपात आरसी मिळेल. 
  • इच्छा असल्यास आपण ॲड-टू-माय-डॅशबोर्डवर क्‍लिक करून व्हर्च्युअल आरसी आपल्या खात्यात जोडू शकता.

अशी शेअर करा ‘आरसी’

  • व्हर्च्युअल आरसी डाऊनलोड केल्यानंतर आपणास आरसी शेअर करता येते. जर तुमचे वाहन चालक किंवा घरातील इतर सदस्य चालवत असतील तर व्हर्च्युअल आरसी त्यांच्या एम-परिवहन ॲपवर ठराविक काळासाठी पाठवू शकता.
  • तुम्ही एकापेक्षा जास्त वाहनांचे मालक असाल तर एकापेक्षा जास्त व्हर्च्युअल आरसी तुम्ही डाऊनलोड करून या ॲपमध्ये ठेवू शकता.
  • सुरक्षित क्‍यूआर कोड तयार करण्याचा पर्याय यात आहे. त्याचा वापर करून आपण सुरक्षित क्‍यूआर कोड जनरेट करून आपल्या वाहनावर चिकटवून ठेवू शकता.

(सदर मोबाईल ॲप इंग्रजी व हिंदी भाषेत असून लवकरच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करणार आहे).

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com