का पाडणार आहेत ‘गाडीखाना’ इमारत?

ज्ञानेश सावंत
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

पुणेकरांच्या अडीचशे कोटी रुपयांतून महापालिकेने हॉस्पिटल, दवाखान्यांसाठी बांधलेल्या चार इमारती पडून असतानाच २५ कोटी रुपये खर्चून नवी इमारत उभाण्यात येणार आहे. डॉ. कोटणीस रुग्णालयाची (गाडीखाना) इमारत जमीनदोस्त करून त्याजागी ‘मल्टी स्पेशालिटी’ हॉस्पिटल उभारण्याचा खटाटोप लोकप्रतिनिधी करीत आहेत. या इमारतीला १२ वर्षे धोका नाही, असे अधिकारी सांगत असूनही ती पाडण्याचा प्रस्ताव तयार होत आहे.

पुणे - पुणेकरांच्या अडीचशे कोटी रुपयांतून महापालिकेने हॉस्पिटल, दवाखान्यांसाठी बांधलेल्या चार इमारती पडून असतानाच २५ कोटी रुपये खर्चून नवी इमारत उभाण्यात येणार आहे. डॉ. कोटणीस रुग्णालयाची (गाडीखाना) इमारत जमीनदोस्त करून त्याजागी ‘मल्टी स्पेशालिटी’ हॉस्पिटल उभारण्याचा खटाटोप लोकप्रतिनिधी करीत आहेत. या इमारतीला १२ वर्षे धोका नाही, असे अधिकारी सांगत असूनही ती पाडण्याचा प्रस्ताव तयार होत आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

शुक्रवार पेठेत डॉ. कोटणीस रुग्णालयाची दोन मजली इमारत आहे. त्याठिकाणी मेडिकल स्टोअरसह क्षयरोग तपासणी केंद्र आणि पॅथलॅबची सोय आहे. या रुग्णालयाची उभारणी १९७१ मध्ये झाली असून, काही वर्षांपूर्वी नूतनीकरणही झाले आहे. महापालिकेच्या ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’नुसार या इमारतीला धोका नसल्याचे दिसून आले आहे. मात्र रुग्णालयाची दुरवस्था झाल्याचे दाखवत इमारत पाडण्याचे धोरण महापालिकेने घेतले आहे. या जागेत नवी पाच मजली इमारत बांधावी, असा प्रस्ताव भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी दिला आहे. त्याचे सादरीकरणही अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्याकडे झाले आहे. या प्रस्तावासाठी एका नेत्याचा दबाव असल्याने प्रशासनही वेगाने काम करीत आहे.  

...म्हणून उद्या सुट्टी जाहीर 

आरोग्य यंत्रणेची व्याप्ती वाढविण्यात येत आहे. त्यात काही भागांत इमारती बांधून त्याठिकाणी ‘मल्टी स्पेशालिटी’ची सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातून कर्वेनगर, सिंहगड रस्ता, येरवडा आणि बोपोडीत बांधलेल्या चार इमारती गेल्या आठ वर्षांपासून पडून आहेत. या पाच मजली इमारतींचा वापर करण्याऐवजी नव्या जागांवर हॉस्पिटल बांधले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

या इमारती पडून

  • राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा, ५ मजले 
  • डॉ. लायगुडे दवाखाना, सिंहगड रस्ता, ४ मजले (तळमजला ओपीडी)
  • मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, कर्वेनगर, ५ मजले (ओपीडी)
  • जुने सह्याद्री हॉस्पिटल, बोपोडी, ५ मजले (ओपीडी) 

नव्या इमारतीसाठी वास्तुविशारद नेमून कार्यवाही केली जाईल. मात्र, प्रस्तावित इमारतीच्या बांधकामाच्या नकाशाचे सादरीकरण लोकप्रतिनिधींनी केले. या कामासाठी सध्या दोन कोटींची तरतूद आहे. या रुग्णालयाच्या इमारतीला ४८ वर्षे झाली आहेत.
- शिवाजी लंके, प्रमुख, भवन विभाग, महापालिका

डॉ. कोटणीस रुग्णालयातील विभागांची दुरवस्था झाल्याने लोकांना चांगल्या सेवा देण्यासाठी नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याठिकाणी कर्करोग आणि अन्य रोगांच्या निदानाची सोय असेल.
- आरती कोंढरे, नगरसेविका  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr kotnis hospital building will break