Dr. Mohan Bhagwat : श्रीक्षेत्र भगवानगडाच्या महंतांनी घेतली सरसंघचालकांची भेट

राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
Dr. Mohan Bhagwat
Dr. Mohan Bhagwat sakal

पुणे : राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. डॉ. भागवत हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना नामदेवशास्त्रींनी ही भेट घेत, भगवानगडावर उभारण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्‍वरांच्या मंदिराची आणि पुढच्या वर्षी होत असलेल्या भगवानगडाच्या अमृतमहोत्सवाबाबतची माहिती त्यांना दिली.

श्री क्षेत्र भगवानगडावर लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून सुमारे २६ कोटी रुपये खर्च करून संत ज्ञानेश्‍वरांचे मंदिर बांधण्यात येणार आहे. ही माहिती देण्यासाठी महंत नामदेवशास्त्री सानप यांनी ही भेट घेतली. या वेळी त्यांनी डॉ. भागवत यांना श्री क्षेत्र भगवानगडावर येण्याचे आमंत्रण दिले. या वेळी डॉ. भागवत यांनी भगवानगडाची संपूर्ण माहिती नामदेवशास्त्री यांच्याकडून घेतली.

Dr. Mohan Bhagwat
Pune Kidnapping News : चिखलीतील अल्पवयीन अपहृत मुलीची सुटका ; हिमाचल प्रदेशातून स्वगृही

पुढील वर्षांत श्री क्षेत्र भगवानगडाचा अमृतमहोत्सव आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदींना भगवानगडावर निमंत्रित करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि श्री क्षेत्र भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com