esakal | डॉ. बहुलकर यांची 'ऑक्सफर्ड'चे वरिष्ठ फेलो म्हणून निवड
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बहुलकर यांची 'ऑक्सफर्ड'चे वरिष्ठ फेलो म्हणून निवड

डॉ. बहुलकर यांची 'ऑक्सफर्ड'चे वरिष्ठ फेलो म्हणून निवड

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीज (ओसीएचएस) या अध्ययन केंद्राने वरिष्ठ फेलो म्हणून प्रा. डॉ. श्रीकांत बहुलकर यांची निवड झाली आहे. प्रा. बहुलकर हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी मानद सचिव व ज्येष्ठ संशोधक आहे.

हेही वाचा: SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

प्रा. बहुलकर हे गेली ४० वर्षे अध्ययन क्षेत्रात कार्यरत असून प्रामुख्याने संस्कृत व बौद्ध विद्येचे अभ्यासक आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्धविद्या विभागात ते संलग्न प्राध्यापक आहेत. वेद, संस्कृत, पाली, बौद्धविद्या अशा विविध विषयांवरील त्यांच्या संशोधनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. प्रा. बहुलकर यांनी विविध देशांमधील ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे. त्यांची आजपर्यंत विविध विषयांवरील १२ पुस्तके प्रकाशित झाली असून सुमारे ६५ संशोधनपर लेख लिहीले आहेत.

हेही वाचा: नाहीतर ही जनता ह्या सरकारचा अंत केल्या शिवाय राहणार नाही - मनसे

ओसीएचएस या केंद्राची स्थापना १९९७ मध्ये हिंदू संस्कृती, तत्त्वज्ञान आणि धर्मांचा अभ्यास करण्यासाठी झाली असून जगातील अशा प्रकारची ही पहिली अकादमी आहे. प्राचीन हिंदू ग्रंथांबद्दल जाणून घेण्यात रस असलेल्या आंतरराष्ट्रीय लोकांसाठी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जागतिक दर्जाचे अभ्यासक ही संस्था एकत्र आणते.

loading image