कुशल मागणीशी सांगड घालण्यासाठी प्राध्यापकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावं : डॉ. परदेशी

डॉ. संदेश शहा
Tuesday, 17 December 2019

यांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बदलत्या अभ्यासक्रमाची औद्योगिक कंपनीमधील कुशल मागणीशी सांगड घालण्यासाठी प्राध्यापकांनी सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.

- डॉ. एस. एस. परदेशी, अध्यक्ष, यांत्रिकी अभियांत्रिकी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

इंदापूर : यांत्रिकी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बदलत्या अभ्यासक्रमाची औद्योगिक कंपनीमधील कुशल मागणीशी सांगड घालण्यासाठी प्राध्यापकांनी सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांत्रिकी अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एस. परदेशी यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूरजवळील वनगळी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी संस्थेचे प्राचार्य पी. बी. माने उपस्थित होते.

डॉ. परदेशी यांचा प्राचार्य डॉ.प्रवीण नेमाडे व कार्यक्रम समन्वयक प्रा. संजय क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी डॉ. परदेशी यांनी विभागप्रमुख प्रा. संजय क्षीरसागर यांच्याकडून विभागाने केलेले कार्यक्रम, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात संपादन केलेले यश, विभागातील विविध आधुनिक उपकरणे व सॉफ्टवेअर, त्याचा विद्यार्थी विकासासाठी वापर याची माहिती घेतली. यावेळी डॉ. परदेशी यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधत विद्यापीठ प्रकल्पांची माहिती दिली. 

ट्विटरवर कलाकारांवर भडकले नेटकरी; म्हणतात, #ShameonBollywood

डॉ. परदेशी पुढे म्हणाले, शिक्षणाची परिणामकारकता वाढवून तसेच त्यास कौशल्याची जोड देऊन युवापिढी सक्षमीकरण होण्यासाठी प्राध्यापकांनी सकारात्मक योगदान देणे गरजेचे आहे. 

दुर्मीळ पक्ष्यांच्या शिकारीची पाककडून परवानगी

संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, विश्वस्त अंकिता पाटील, सल्लागार डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संदीप कांबळे, सोमनाथ कोळगिरी, कैलास करे, दीपक अधापुरे, आशिष आमृते, श्रीकांत पेशटवार, आदेश माळवे , खंडू पवळ, सोनाली देशमुख, गणेश खारे, स्वप्नील गायकवाड, कोंडीबा कुबेर, मयूर जगताप, श्रीकांत महाडिक हे प्राध्यापक उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr SS Pardeshi commented about Industrial Company Issue