esakal | ड्रॅगन फ्रुटने केली वीस वर्षांची तजवीज
sakal

बोलून बातमी शोधा

ड्रॅगन फ्रुट

ड्रॅगन फ्रुटने केली वीस वर्षांची तजवीज

sakal_logo
By
भरत पचंगे ः सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : कोरोनावर उत्तम टॉनिक समजल्या जाणाऱ्या ड्रॅगन फ्रुटने केंदूर (ता. शिरूर) येथील सुरेश बबन ताठे या शेतकऱ्याची पुढील वीस वर्षांची चिंता मिटविली आहे. कोरोना काळातील बाजारपेठेचा अंदाज घेवून अर्धा एकरामध्ये ड्रॅगनफ्रुटची लागवड केली अन्‌ त्याद्वारे आता त्यांना प्रति सहा महिन्याला एक लाखाचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आता पुढील वीस वर्षे ताठे कुटुंबास शाश्‍वत उप्तन्न मिळणार आहे.

हेही वाचा: गर्दी न करता सण साजरे करा - अजित पवार

केंदूरमधील सुरेश ताठे व लता या दांपत्यांनी चाकण औद्योगिक परिसरात अभियंता असलेला मुलगा कुमार व सुनबाई किरण यांच्या आग्रहाखातर घराजवळीलच २० गुंठ्यात ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगोला (पंढरपूर) येथून २५ रुपयांना एक रोप या दराने ५०० रोपे आणली व त्याची नियोजनबद्धपान

हेही वाचा: इंदापूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : मंत्री दत्तात्रय भरणे

लागवड करून भरघोस उत्पादन घेवून कोरोनाकाळातही चांगले उत्पन्न मिळविल्याचे मिळविले आहे. सध्याच्या कोरोनाकाळात सर्वच बाजारपेठा अडखळच सुरू आहेत, त्याच काळात ताठे दांपत्याने पुढील वीस वर्षांची हमखास उत्पन्नाची तजवीज केली आहे. कारण ही बाग अशाच पद्धतीने पुढील वीस वर्षे फळे देणार असल्याची ड्रॅगन फळाची खासीयत आहे.

  • एका फळाचे वजन - ४०० ते ५०० ग्रॅम

  • प्रतिकिलो भाव - १८० ते २५० रुपये

अशी केली लागवड...

१. अर्धा एकरात सरीवाफा तयार केले

२. सिमेंटखांबावर गोल चक्र उभारली

३. एका खांबाभोवती चार झाडे लावली

४. शेण, कोंबडी, निंबोळी खतांचा वापर

६. रासायनिक खतांची मात्रा दिली.

हेही वाचा: कर्वेनगर: 'ई-लर्निंग' स्कुलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

आणखी एका एकरात लागवडीचे प्रयोजन

कोरोना काळात सर्वाधिक विक्री होत असलेले हे फळ आता ग्रामीण भागातील ग्राहकही आवर्जून खात असल्याने पुण्याच्या बाजारपेठेतही या फळाने आपले स्थान निर्माण केल्याचेही ताठे सांगतात. साठी ओलांडलेल्या ताठे व त्यांच्या पत्नी लता यांच्या मदतीला त्यांचे धाकटे बंधू देवानंद ताठे व सुवर्णा ताठेही येत असल्याने पुढील तीन महिन्यात ड्रॅगन फ्रुटची आणखी एका एकरात लागवड करण्याचे प्रयोजन असल्याचे ताठे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: बारामती-इंदापूर राज्यमार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू

"ड्रॅगन फ्रुटमुळे गेल्या सहा महिन्याच्या एका सिझनमध्ये एका लाखाची कमाई झाली आहे. शेतीची मशागत, सिमेंट खांब, रोपे आदींचा एकूण १ लाख ७५ हजारांचा खर्च करून उभ्या राहिलेल्या या ड्रॅगन बागेने कमी पाण्यात एका सिझनला १ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्षभरात प्रतिसहा महिन्यांच्या अंतराने दोन हंगामात चांगल्या उत्पादनाची शाश्वती आहे."

- सुरेश ताठे, ड्रॅगन फ्रुट उत्पादक

loading image
go to top