जैविक खतांमुळे वाढला ड्रॅगन फ्रूटचा गोडवा

जैविक खतांमुळे वाढला ड्रॅगन फ्रूटचा गोडवा
Published on: 

आळेफाटा, ता. १७ : राजुरी (ता. जुन्नर) येथील महिला शेतकरी संजीवनी लक्ष्मण औटी यांनी ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची जैविक खतांच्या जोरावर एक एकरमध्ये लागवड केली व १२ टन उत्पादन मिळविले. यातून त्यांना दोन लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक आणि नगर येथील बाजारपेठांमध्ये या फळाला मोठी मागणी आहे.
औटी यांपी फुलविलेल्या ड्रॅगन फ्रूटला सध्या प्रतिकिलो १०० ते १२० रुपये बाजारभाव मिळत आहे. संजीवनी औटी यांनी दोन वर्षांपूर्वी एक एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी अनुभवी शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन व्यवस्थापन आणि खतांच्या वापराचा अभ्यास केला होता.

दृष्टिक्षेपात
- शेणखत, गूळ, गोमूत्र, वारुळाची माती आणि ताक यांपासून तयार केलेल्या स्लरीचा वापर
- झाडांची जैविक पद्धतीने वाढ जोमदार होऊन दर्जेदार फळे लगडली
- उष्ण हवामानात येणारे हे पीक पाणीटंचाई असलेल्या भागासाठी उत्तम पर्याय

जुन्नरमधील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग
ड्रॅगन फ्रूटच्या प्रयोगासाठी संजीवनी औटी यांना त्यांचे पती लक्ष्मण तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक वल्लभ शेळके, संजय औटी, जी. के. औटी, पांडुरंग औटी, मुलगा रवींद्र व सून जानकी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचा ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग पूर्व जुन्नरमधील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

08945

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com