esakal | डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण, पाच आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चिती
sakal

बोलून बातमी शोधा

dabholkar

डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण, पाच आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर मंगळवारी (ता. ७) आरोप निश्चित करण्यात येणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा: अधिकाऱ्यासह दोघेजण 8 हजाराची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर आरोप निश्‍चिती करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत.

हेही वाचा: मुलीने नष्ट केले नानासाहेब गायकवाडच्या सावकारी व बेहिशोबी मालमत्तेचे पुरावे

तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून अॅड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत. विशेष न्यायालयात शुक्रवारी (ता.३) आरोपींवर आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद करण्यात आला. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी खटल्याची पार्श्वभूमी सांगत आरोपींवरील आरोप निश्चित करण्याची मागणी केली. आरोपींवर कोणत्या कलमांखाली आरोप निश्चिती करायची आहे. याबाबत मंगळवारी सुनावणी होणार असून, त्यासाठी सर्व आरोपींना प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

अटकेची कारवाई संशयास्पद : अॅड. इचलकरंजीकर

आरोप निश्चितीला विरोध करताना तपास यंत्रणांच्या तपासावरच बचाव पक्षाने आक्षेप घेतला. बचाव पक्षातर्फे अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सीबीआयच्या दोषारोपपत्रात विसंगती असल्याचा युक्तिवाद केला. अॅड. पुनाळेकर यांनीही आपली बाजू मांडली. मनीष नागोरी, विकास खंडेलवाल, डॉ. तावडे आणि आत्ता त्यांच्याबरोबर कळसकर, अंदुरे यांसह इतरांवर करण्यात आलेल्या अटकेची कारवाई संशयास्पद असल्याचे युक्तिवाद अॅड. इचलकरंजीकर यांनी केला.

loading image
go to top