Pune News : कोथरुड मध्ये दूध प्या संदेश देत नववर्षाचे स्वागत; चेंज इंडिया फाऊंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

चेंज इंडिया फाऊंडेशनच्या वतीने दारु नको मसाला दूध प्या या कार्यक्रमाचे आयोजन
drink milk not alcohol change india foundation kothrud health awareness
drink milk not alcohol change india foundation kothrud health awarenessSakal

कोथरुड : पिवून बेहोष होण्या ऐवजी, दूध पेवून तरतरीत व्हा असा सकारात्मक संदेश देत कोथरुड मधील मंडळांनी दारु नको दूध प्या असे कार्यक्रम कोथरुड मध्ये ठिकठिकाणी आयोजित केले. त्याला सर्व थरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

चेंज इंडिया फाऊंडेशनच्या वतीने दारु नको मसाला दूध प्या या कार्यक्रमाचे आयोजन कोथरुड डेपो येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष होते. यावेळी वसुंधरा परिवाराचे धनंजय झुरंगे, सारंग मोकाटे उपस्थित होते.

संयोजक सचिन धनकुडे म्हणाले की, दारु बंद करणे सरकारला अशक्य वाटते म्हणून त्यांनी दारुची दुकाने आज देखील चालू ठेवली आहेत. परंतु आपल्या लोकांना चांगले वळण लावणे हे आपल्याच हातात आहे.

म्हणून आम्ही दरवर्षी हा उपक्रम राबवतो. पिणे वाले को पीणे का बहाणा चाहिए म्हणतात. आम्ही त्यांना दूधाचा पर्याय देत, नवी पीढी बलशाली बणावी म्हणून प्रोत्साहन देत आहे. राजमाता जिजाऊ मासाहेब नगर (सुतारदरा) येथील शिवकल्याण मित्रमंडळ, संतोष डोख मित्र परिवाराने मसाला दुध वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.

दिपाली डोख म्हणाल्या की, आम्ही गेली चार वर्षे हा कार्यक्रम करत आहे. कष्टकरी जनतेने दारु वर खर्च करण्या ऐवजी तो पैसा आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, कुटूंबाच्या प्रगतीसाठी वापरावा असा संदेश आम्ही या माध्यमातून देत आहे.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत पाटील, दत्ताभाऊ भगत, राजाभाऊ म्हाळुंगे, शिवकल्याण रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अमित कोंढाळकर आदी उपस्थित होते. भीमयोध्दा फाऊंडेशन महिला बचत गटाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दुग्धप्रसाद प्राशन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com