कोथरूडकरांची काळजी वाढली; औषध व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केले आहे.

une-news" target="_blank">पुणे) : कोथरूडमध्ये शुक्रवारी (ता.२३) दोन रूग्ण आढळून आले होते. तोच आज पुन्हा एका नव्या रुग्णाची भर पडली आहे. हा नवीन रुग्ण एक औषध व्यावसायिक असल्याने प्रशासनापुढे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सदर व्यक्ती कोथरूड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असून त्यांचा औषध विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तीचा संपर्क सदाशिव पेठेतील औषध विक्रेत्याशी आला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

वीज ग्राहकांनो,आता घरबसल्या मांडा तक्रारी; महावितरणाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय 

कोथरूडमधील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता स्थानिक गणेशोत्सव मंडळाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांची पोलिसांनी मदत घ्यावी, आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार आहोत, असे सामाजिक कार्यकर्ते नामदेव ओव्हाळ यांनी सांगितले.

- शहरांमधील बांधकाम व्यावसायिक सापडले नियमावलीच्या कात्रीत; वाचा सविस्तर बातमी

सध्या कोथरुडमधील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची एकूण संख्या सातवर पोहोचली आहे, अशी माहिती कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी दिली. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केले आहे. या तपासणी अहवालात काय आढळते याकडे कोथरुडकरांचे डोळे लागले आहेत.

माळेगाव कारखान्यातील अपघाताची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल   

दरम्यान साईनाथ वसाहत येथे भारतीय जनता पक्ष पुणे शहरच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. सहभागींना प्रतिकारशक्ती वाढवण्याचे औषध देण्यात आले. संयोजक डाॅ. संदीप बुटाला म्हणाले की, एका व्यक्तीला उच्च ताप आढळल्याने त्याला पुढील तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. या उपक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य सचिन पवार यांनी संयोजन केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The drug dealer in Kothrud found corona positive