हुक्क्यामध्ये चक्क अमलीपदार्थांची झिंग; ब्राऊनशुगरसह सुगंधी द्रव्याचा वापर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 February 2021

पुणे शहरात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना गांजा, ब्राऊनशुगरची तलफ  हुक्क्याच्या माध्यमातून भागविली जाते. त्यामुळे हुक्का ओढल्यानंतर अधिकच झिंग येते. त्यामुळे हुक्का ओढणारी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असल्याचे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या युवकाने सांगितले.

पुणे - शहरात सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरमध्ये ग्राहकांना गांजा, ब्राऊनशुगरची तलफ  हुक्क्याच्या माध्यमातून भागविली जाते. त्यामुळे हुक्का ओढल्यानंतर अधिकच झिंग येते. त्यामुळे हुक्का ओढणारी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असल्याचे व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या युवकाने सांगितले. याला व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांनीही दुजोरा दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील अंमलीपदार्थ विरोधी पथकाला गुंगारा देऊन शहरातील हॉटेलमध्ये राजरोसपणे हुक्का पार्लरमध्ये गांजा, ब्राऊनशुगर आदींची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. हुक्का पार्लर चालकांना कोणा, कोणाची मर्जी सांभाळावी लागते, याची यादीच त्यांच्याकडे असते. या यादीत अग्रक्रमावर अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे नाव असते. त्यानंतर गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारीच नव्हे तर गस्तीवर असणाऱ्या बीट मार्शलचीसुद्धा त्यांना मर्जी सांभाळावी लागते. त्यामुळे हुक्क्यामध्ये ‘हर्बल’ पदार्थ वापरले जातात, हा युक्तिवाद फोल ठरतो. त्यामध्ये अमलीपदार्थ वापरले जात असल्याचे पुरावे प्रत्यक्षदर्शी नव्हे तर व्यसनाधीन झालेले व आता उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सांगितले. यासह अशा रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व समुपदेशकांनीसद्धा याला दुजोरा दिला आहे.

मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल

हुक्क्यामध्ये गांजा, ब्राऊनशुगर टाकत असण्याची दाट शक्यता आहे. व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या आरोग्य तपासणी अहवालात ते आढळून येते. 
- अजय दुधाणे, संचालक, समुपदेशक, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र

बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड

सुरवातीला गंमत म्हणून मित्रांसोबत हुक्का पॉर्लरमध्ये जात होता. तेथे हुक्का ओढणाऱ्या मुलींचे आकर्षण वाटत होते. हुक्क्यामध्ये गांजा, ब्राऊनशुगर टाकले जात होते. व्यसनाधीन झाल्यानंतर काय करतो, काय बोलतो, याचे भान राहत नव्हते. पालकांनी मला व्यसनमुक्ती केंद्रात आणल्यामुळे आता थोडे बरे वाटत आहे.
- राहुल ( नाव बदलले आहे), संगणक अभियंता

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Drugs use in hukka brown sugar Perfume Addiction