पुणे : 'डीएसके ड्रिमसिटी'साठी नवीन बिल्डर नेमा; न्यायालयात प्रस्ताव!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

डीएसके यांना गादी, पांघरून, टेबल आणि खुर्ची मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.

पुणे : सोलापूर रस्त्यावर असलेला 'डीएसके ड्रीम सिटी' प्रकल्प न्यायालयाने नवीन बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद नेमून पूर्ण करावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून 10 हजार कोटी रुपये जमा होतील. त्यातील 40 टक्के रक्कम बांधकाम व्यावसायिकाला आणि उर्वरित रक्कम गुंतवणूकदारांना द्यावी, असा प्रस्ताव बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांनी सोमवारी (ता.20) न्यायालयात दिला आहे.

- ‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा लिलाव करण्याबाबत नोटीस काढून ती प्रत्यक्ष विक्रीस काढण्यात मोठा वेळ जाऊ शकतो. त्यात अनेकांच्या हरकती येत शकता. त्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळण्यात उशीर होईल. त्यामुळे न्यायालयाने स्वतः एखादा बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद नियुक्त करावा. त्यांच्या माध्यमातून डीएसके ड्रीम सिटी प्रकल्प पूर्ण करून त्यांची विक्री करावी.

- तानाजी चित्रपटासाठी विद्यार्थ्याने चक्क मुख्यध्यापकांना लिहिले...

या एका प्रकल्पातून 10 हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा प्रस्ताव डीएसके यांनी न्यायालयास दिल्याचे त्यांचे वकील धीरज घाडगे यांनी सांगितले. यावर न्यायालयाने मालमत्ता का जप्त का करू नये? अशी नोटीस बचावली आहे. तसेच याबाबत 3 फेब्रुवारी रोजी आपले सविस्तर म्हणणे मांडावे, असे न्यायालयाने सांगितले.

डीएसके यांना गादी, पांघरून, टेबल आणि खुर्ची मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर न्यायवैद्यकीय अहवाल मिळावा यासंदर्भात अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने न्यायवैद्यकीय अहवाल देण्याचा आदेश दिला होता.

- विकासाचे धोरण बदलले तरच अर्थव्यवस्थेला चालना : अच्युत गोडबोले

या सर्व बाबींना दोन वर्ष होऊन गेल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. डीएसके त्यांची पत्नी आणि मुलाला आठवड्यातून दोन वेळा दोन तास भेटू द्यावे, अशी विनंती देखील त्यांच्या वकिलाने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DS Kulkarni has proposed in court that the choose new builder for DSK Dreamcity