सिगारेटमुळे टोळक्याकडून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

सिगारेट पेटविण्यासाठी लायटर मागितल्याच्या कारणातून टोळक्याने एका तरुणाला दगड व लाथाबुक्यांने मारहाण
सिगारेटमुळे टोळक्याकडून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न
सिगारेटमुळे टोळक्याकडून तरुणाच्या खूनाचा प्रयत्नsakal

पुणे : सिगारेट पेटविण्यासाठी लायटर मागितल्याच्या कारणातून एक महिन्यापूर्वी झालेल्या बाचाबाचीतून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला दगड व लाथाबुक्यांने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री अकराच्या सुमारास कोंढवा बुद्रूक येथील काकडेवस्ती परिसरात घडली.या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी ताऊ जोगन, चंदू गायकवाड, आकाश कोळी, किरण रणदिवे, सूरज खंडागळे, वैभव डबकरे, गणेश जोगदंड आणि इतर दोन अशा आठ जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यातील चौघे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, आकाश कोळी याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र गोपाल लामीचंद (वय १८, रा. काकडेवस्ती, कोंढवा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनीच याबाबत फिर्यादी दिली आहे.

सिगारेटमुळे टोळक्याकडून तरुणाच्या खूनाचा प्रयत्न
हांडेवाडी चौकाजवळ कचऱ्याचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेंद्र यांची एका महिन्यापूर्वी चंदू गायकवाड याच्यासोबत सिगारेट पिण्यासाठी लायटर मागितल्याच्या कारणातून फासीगेट येथील पानटपरीवर बाचाबाची झाली होती. घटनेच्या दिवशी सुरेंद्र हे त्यांचे मित्र रोहन, पार्थ व रोहीत यांच्यासोबत काकडे वस्ती येथील फायरऑन हा चायनिजचा स्टॉल बंद करून थांबले होते. त्यावेळी दोघा अनोळखी व्यक्तींनी सुरेंद्र यांना शिवीगाळ करत आम्हाला खुन्नस देतो का, तुला आमच्या एरियात राहायचे आहे का, तुझा आज गेमच करतो असे म्हटले. यावेळी सुरेंद्र यांचा मित्र रोहीत राठोड याला हाताने मारहाण करत आरोपींनी हा त्या दिवशी लायटर मागत होता, आज याची विकेट टाकूया असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये सुरेंद्र हा जखमी झाला आहे.

आमच्या नादाला लागलात तर तो ढगात गेला समजा

सुरेंद्र यांना मारहाण केल्यानंतर आरोपींनी परिसरातील नागरिकांना पाहून आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागलात तर तो ढगात गेलाच म्हणून समजा, असे म्हणून आरडाओरडा करत कोयता व तलवार हवेत नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वैभव सोनावणे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com