panshet dam
panshet damsakal

पानशेत धरण १०० टक्के भरले

जुलै महिना अखेर चार धरणे १०० टक्के भरली आहेत.

खडकवासला : पानशेत धरण (panshet dam) सोमवारी रात्री १०० टक्के भरले . यामुळे रात्री अकरा वाजता वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, मागील आठवड्यातही वीजनिर्मितीसाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, पाऊस कमी झाल्याने रविवारी (ता. १) पहाटे हा विसर्ग बंद करण्यात आला होता. (due to rain panshet dam full)

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग रविवारी रात्री आठ वाजता पूर्णपणे बंद केला. त्यानंतर खडकवासला रात्री धरण ९५ टक्के भरले होते. पावसाचा जोर पाहून मंगळवारी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. आज सोमवार अखेर चार धरणात मिळून २६.८० टीएमसी म्हणजे ९१.९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

panshet dam
उजनीत वाळू उपसा करणाऱ्या दहा बोटी उद्ध्वस्त

धरण साखळीतील चार धरणाची एकूण साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. आज अखेर धरणात २६.८० टीएमसी म्हणजे ९१.९५ टक्के धरणसाठा झालेला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी दिली. आणखी २.३५ टीएमसी पाणी जमा झाले की चार ही धरणे १०० टक्के भरतील. दरम्यान खडकवासला धरणातून सुमारे चार टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. ते मोजले असता. जुलै महिना अखेर चार धरणे १०० टक्के भरली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com