खवय्यांनो, खेड शिवापूर परिसरात मिळणार पार्सल जेवण 

hotel
hotel

खेड शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्यावर हॉटेल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड शिवापूर परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी 'पार्सल' सेवा सुरू केली आहे. हॉटेल कामगारांचे पगार, इतर खर्च आणि मूळ म्हणजे हॉटेल व्यवसाय सुरू राहण्यासाठी 'पार्सल सेवे'चा मार्ग अवलंबला आहे, असे अनेक हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 

पुणे-सातारा रस्त्यावर खेड शिवापूर हॉटेल हब म्हणून ओळखले जाते. या परिसरात लहान मोठी सुमारे शंभर हॉटेल आहेत. पिठलं भाकरी, भेळ, मिसळ आणि मटण भाकरीसाठी येथील हॉटेल प्रसिद्ध आहेत. पुणे- सातारा रस्त्यावर प्रवास करताना नागरिक आवर्जून या ठिकाणी नाष्टा आणि जेवणासाठी थांबतात. तसेच, पुणे शहरातून अनेक जण या ठिकाणी जेवणासाठी येतात. 

या भागात हॉटेलांची संख्या जास्त असल्याने सहाजिकच या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्याही जास्त आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे हॉटेल बंद होती. सध्या या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी जेवण आणि नाष्ट्याची पार्सल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक हॉटेलांमध्ये पार्सल सेवा सुरू केली आहे, तर अनेक हॉटेल चालक 1 जूनपासून पार्सल सेवा सुरू करणार आहेत.

हॉटेलमध्ये काम करणारे अनेक स्थानिक पुरुष आणि महिला कामगार आहेत. त्या कामगारांचा पगार सुरू होईल, हॉटेलचा इतर खर्च आणि मूळ म्हणजे हॉटेल व्यवसाय सुरु राहील, या कारणांसाठी पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे, असे अनेक 
हॉटेल व्यवसायिकांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com