पहिले ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाबाबत मोठा निर्णय; पाहा विद्यार्थ्यांना कसे मिळणार धडे

school.jpg
school.jpg
Updated on

पुणे : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन वर्गांबरोबरच शिक्षण विभागाने जिओ टीव्हीद्वारेही शिक्षण घेण्याची सोयही उपलब्ध करून दिले आहे. त्यापाठोपाठ आता शिक्षण विभागाने 'यु-ट्यूब चॅनल'द्वारेही धडे गिरविण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्याने चार शैक्षणिक यू-ट्यूब चॅनल तयार केले आहेत. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते दहावी मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. आता लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. याबाबत ट्वीट करत गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही गायकवाड यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

या यु-ट्यूब चॅनलद्वारे शैक्षणिक साहित्य  राज्यातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी उपलब्ध झाले आहे. याशिवाय चॅनलवर दररोज अधिकाधिक ई साहित्य वाढवले जात असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

- मराठी  माध्यम इ.१ ली ते इ. ७ वी चॅनलचे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UCWiEAHa31TYXjV36P2uIOxg 

- मराठी  माध्यम इ.८ ते इ. १०वी चॅनलचे नाव :-  SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCH9SeVEZteZliA3Eb3uHB4w 

- उर्दू माध्यम इ.१ ते इ. ७वी चॅनलचे नाव : SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
https://www.youtube.com/channel/UC9GxDTgdlD9uc0BcUPKfWHg

- उर्दू माध्यम इ.८ ते इ. १०वी चॅनलचे नाव :-  SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
https://www.youtube.com/channel/UCtjhPV_jp16h68e3FteKMbQ

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com