Breaking : इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया स्थगित; मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा परिणाम!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 75 हजार पेक्षा जास्त जणांनी त्यांचा पसंतीक्रम भरला आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता जाहीर केली जाणार होती.​

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने याचा परिणाम इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. गुरुवारी (ता.10) दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर केली जाणार होती, ती पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 304 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये 1 लाख 7 हजार 30 प्रवेश क्षमता असून, 1 लाख 372 जणांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये 30हजार पेक्षा जास्त जणांनी 11वीचा प्रवेश निश्‍चित केला आहे.

Big Breaking : पुणे विद्यापीठ निर्णयावर ठाम; परीक्षा 'एमसीक्‍यू'नेच होणार!​

दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 75 हजार पेक्षा जास्त जणांनी त्यांचा पसंतीक्रम भरला आहे. दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता जाहीर केली जाणार होती. पालक आणि विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळेल की नाही याची चिंता लागलेली असताना दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीकडे त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, आता पुढे ढकलण्यात आल्याने आणखी चिंतेत भर पडणार आहे.

मराठा संघटनांंनी राज्य सरकारवर फोडलं खापर; आरक्षणाच्या स्थगितीबाबत दिल्या 'या' प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी आणि इयत्ता 11वी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नेमके काय नमूद केले आहे त्याचा अभ्यास करून शासन पुढील आदेश देईल, तो पर्यंत ही प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education department postpone 11th admission process after Supreme Court stayed Maratha reservation