पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

फिर्यादी हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये अध्यापनासाठी अतिरीक्त विषय मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता.

पुणे : अध्यापनाचे अतिरीक्त विषय मंजूर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू पोपट खांदवे (वय 31) असे 'एसीबी'च्या पथकाने अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये अध्यापनासाठी अतिरीक्त विषय मंजूर करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचे काम अनेक दिवस प्रलंबित होते.

- गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांचं काय? मुदत संपण्याला उरले काही दिवस

दरम्यान, संबंधित कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या राजू खांदवे याने अतिरीक्त विषय मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती तक्रारदार आणि खांदवे यांच्यामध्ये 26 हजार रुपये देण्याचे ठरले. 

- Video : बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला वकिलांनीच दिला चोप!

तक्रारदारांनी याबाबत 'एसीबी'कडे तक्रार नोंदविली. 'एसीबी' कार्यालयाने त्याची दखल घेऊन पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी (ता.6) सायंकाळी पुणे स्टेशन येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये पथकाने सापळा लावला. त्या वेळी तक्रारदार यांच्या 26 हजार रुपयांची लाच घेताना खांदवे यास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी 'हे' दोन मंत्री समन्वय ठेवणार

न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुनील बिले करीत आहेत. पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीहरी पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education department staff demanded bribe of 26 thousand rupees at Pune