Video : बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला वकिलांनीच दिला चोप!

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी (ता.7) आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वकिलांच्या जमावाने आरोपीला मारहाण केली.

इंदूर : देशात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना एकापोठापाठ एक घटत आहेत. तेलंगणा राज्यातील हैदराबाद प्रकरण, उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरण या प्रकरणांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबरोबरच इंदूरजवळील महू येथेही सात दिवसांपूर्वी पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महूसह आसपासच्या परिसरात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

- हैदराबाद प्रकरण : पोलिसांनी केलेल्या एन्काउंटर प्रकरणी सरन्यायाधीश म्हणाले,...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे आई-वडील हे बेघर मजूर आहेत. एका मंदिराच्या बाहेर आपल्या आई-वडिलांसोबत झोपली होती. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. बरीच शोधाशोध झाल्यानंतर सोमवारी (ता.2) तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

- अक्षयकुमार नागरिकत्वाच्या टीकेला कंटाळला; घेतला मोठा निर्णय

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी (ता.7) आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या वकिलांच्या जमावाने आरोपीला मारहाण केली. आणि त्याला आमच्या हवाली करा, अशी पोलिसांना विनंतीही केली. 

- Video : श्रीनिवास पाटील म्हणतात, 'अन् मला निवडून यायचा नाद लागला'

बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिस सर्व पुरावे जमा करण्यात व्यस्त असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन पुरावे गोळा केले. डीएनए अहवालासाठी पोलिसांनी हे पुरावे एफएसएलकडे पाठवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lawyers beaten up accused in five year old innocent girl rape and murder case at Mhow court in Indore