गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकांचं काय? मुदत संपण्याला उरले काही दिवस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

राज्य सरकारने नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्याची मुदत या आठवड्यात संपली आहे.

पुणे : अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळांना राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ 31 डिसेंबरला संपत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निवडणूक घेण्याबाबतच्या नियमावलीवर हरकती आणि सूचना घेण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे अंतिम नियमावली कधी प्रसिद्ध होणार, असा प्रश्न गृहनिर्माण संस्थांच्या संचालकांकडून विचारण्यात येत आहे.

अडीचशेपेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका संस्थांच्याच पातळीवर घ्याव्यात, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, या निवडणुका कशा घ्याव्यात, याबाबत अंतिम नियमावली प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे शेकडो गृहनिर्माण संस्थांच्या संचालक मंडळांच्या निवडणुका रखडल्या आहेत.

- Video : श्रीनिवास पाटील म्हणतात, 'अन् मला निवडून यायचा नाद लागला'

संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, काही मंडळांची मुदत डिसेंबरअखेर संपत आहे. सरकारने अशा गृहनिर्माण संस्थांच्या संचालक मंडळांना 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत अंतिम नियमावली प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे.

- मोदी पुण्यात आले पण, 'हे' काम करायला नाही विसरले

राज्य सरकारने नियमावलीला अंतिम स्वरूप देण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्याची मुदत या आठवड्यात संपली आहे. या नियमावलीत सरकारने अडीचशेपेक्षा कमी सभासदांच्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेताना सहकार विभागाकडून निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असा नियम समाविष्ट केला आहे.

- 'जयपुर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये पुण्याच्या 'मेडिसीन लॅम्पस'ची निवड

या नियमाला काही गृहनिर्माण संस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या फेडरेशनने या नियमाला विरोध दर्शविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about the election of small housing societies