शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांना द्यावी सवलत; AICTE ची सूचना

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकट काळातही देशभरातील काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना वेठीस धरून अभ्यासक्रमांचे पूर्ण वर्षाचे शुल्क भरण्यास सांगत आहेत.
AICTE
AICTESakal

पुणे - कोरोनाच्या (Corna) पार्श्वभूमीवर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांनी, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना (Student) तीन ते चार टप्प्यांत शुल्क (Fee) भरण्यासाठी मुदत द्यावी, तसेच कोणताही नियम डावलून प्राध्यापकांना सेवेतून कमी करू नये. तसेच प्राध्यापकांना (Professor) वेळेत दर महिन्याला वेतन (Salary) देण्यात यावे, अशी स्पष्ट सूचना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) (AICET) दिल्या आहेत. (Educational institutions concessions students for paying fees Orders by AICTE)

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकट काळातही देशभरातील काही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना वेठीस धरून अभ्यासक्रमांचे पूर्ण वर्षाचे शुल्क भरण्यास सांगत आहेत, तर काही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक प्रकारावर तंत्र शिक्षण परिषदेने शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे खडेबोल सुनावले आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे पूर्ण वर्षाचे शुल्क भरणे अडचणीचे होत आहे. मात्र, काही शैक्षणिक संस्थांकडून पूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. तसेच प्राध्यापकांना कामावरून कमी केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना परिषदेने परिपत्रक काढून सूचना केल्या आहेत.

AICTE
पुण्यात लष्कर परिसरात भंगार गोळा करणाऱ्या वृद्धाचा खून

व्यावसायिक अभ्यासक्रमांची सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना तीन ते चार टप्प्यांमध्ये शुल्क भरण्यासाठी मुदत द्यावी. तसेच नियम डावलून प्राध्यापकांना सेवेतून कमी करू नये. त्याचप्रमाणे प्राध्यापकांचे वेतन दर महिन्याला वेळेत द्यावे. तसेच ‘विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीत सवलत देण्यात आली आहे, असे परिपत्रक सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे आणि सर्व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे प्राध्यापकांना कामावरून कमी करू नये, सर्वांना त्यांचे वेतन द्यावे, असे तंत्र शिक्षण परिषदेने परिपत्रकात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com