
शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक दूध देणाऱ्या परदेशी सानेन शेळीचा प्रसार, वृद्धी होणे आवश्यक आहे. सानेन जातींचे गोठविलेले वीर्य किंवा या जातींची प्रजाती लवकरच भारतामध्ये उपलब्ध केली जाईल. शेळी, कोंबडी शेळीपालन व्यवसायाला विमा संरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.
नारायणगाव - शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक दूध देणाऱ्या परदेशी सानेन शेळीचा प्रसार, वृद्धी होणे आवश्यक आहे. सानेन जातींचे गोठविलेले वीर्य किंवा या जातींची प्रजाती लवकरच भारतामध्ये उपलब्ध केली जाईल. शेळी, कोंबडी शेळीपालन व्यवसायाला विमा संरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येथील रुलर अॅग्रीकल्चर इन्स्टिट्यूट (रेन) या संस्थेने सानेन शेळीचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्य केले आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री केदार यांनी येथील रेन व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) या संस्थेच्या सानेन शेळी गोठ्याला भेट देऊन माहिती घेतली. या वेळी केव्हीकेचे अध्यक्ष अनिल मेहेर, रेन संस्थेचे व्यवस्थापक सुभाष दरंदळे, धनेश पडवळ यांनी मंत्री केदार यांना सानेन शेळीची माहिती दिली.
अख्या पुणे जिल्ह्यात रहाटवडे गावाचीच चर्चा
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री केदार म्हणाले, अधिक दूध उत्पादन देणाऱ्या सानेन शेळीचा प्रसार व वृद्धीसाठी अधिक काम होणे गरजेचे आहे. या जातींचे गोठविलेले वीर्य किंवा प्रजाती भारतामध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सानेन शेळी दुधावर प्रक्रिया करून पनीर व इतर पदार्थ बनविल्यास हा व्यवसाय ग्रामीण शेतकऱ्यांना वरदान ठरेल. प्रक्रिया करून शेळीच्या कच्च्या दुधाचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होईल. शेळी व कोंबडी पालनासाठी विमा संरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला जाईल. यावेळी केदार यांनी शेळी पालक सुवर्णा कुंडलीक, निलेश जाधव, विनायक नरवडे या शेतकऱ्यांशी संवाद साधून शेळ्यांची पैदास, खाद्य, उत्पन्न, व्यवस्थापन व अडचणी या बाबत माहिती घेतली.
पुणे : बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरताना शाळेने मागितले 1500 रुपये
अनिल मेहेर म्हणाले, शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या शेळ्या व बोकड उपलब्ध व्हावेत, योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळावे.यासाठी नारायणगाव येथे शेळी पालन गुणवत्ता केंद्राची उभारणी करण्यासाठी राज्य शसनाने मदत करावी.
आमदार अतुल बेनके म्हणाले, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व बेरोजगार तरुणांसाठी शेळीपालन हा उत्तम जोडधंदा आहे. शेळीपालन, गोठा उभारणीसाठी असलेल्या शासनाच्या अनुदान योजनाचा लाभ घ्यावा.
या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, आशा बुचके, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, अरविंद मेहेर, संचालक शशिकांत वाजगे, रत्नदीप भरवीरकर, बाळासाहेब भुजबळ, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, सह आयुक्त डॉ.संतोष पंचपोर, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. राहुल घाडगे यांनी केले.
Edited By - Prashant Patil