दौंडमधील या गावांमध्ये उद्यापासून आठ दिवस जनता कर्फ्यू  

संतोष काळे
मंगळवार, 7 जुलै 2020

अत्यावश्यक सेवा वगळता उद्यापासून कडकडीत आठ दिवस गाव बंद राहिल. याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

राहू (पुणे) :  कोरोनाचा ग्रामीण भागात मोठा शिरकाव झालेला आहे. आज राहू येथे एकास कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे राहू गाव व परिसरातील गावे उद्यापासून पुढील बुधवारपर्यंत (ता. १५) जनता कर्फ्यू पाळणार आहेत. 

रांजणगाव गणपती येथील तिघांची कोरोनावर मात

याबाबत सरपंच दिलीप देशमुख, गाव कामगार तलाठी अर्जुन स्वामी, पोलिस पाटील सुरेश सोनवणे, ग्राम विकास अधिकारी गोरख थोरात यांनी माहिती दिली की, आठ दिवसाच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा म्हणून सर्व मेडिकल, दवाखाने, पिठाची गिरणी,  पाणी फिल्टर योजना सुरू राहतील. दूध संकलन हे सकाळी सहा ते नऊ वेळेत सुरू राहिल. या व्यतिरिक्त आठ दिवस कोणत्याही व्यक्तीने विनाकारण दुचाकी-चारचाकीवर विनाकारण फिरू नये. जर फिरताना आढळल्यास व नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ग्रामपंचायतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. वरील आठ दिवसाच्या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, युको बँक सकाळी 9 ते 1 या कालावधीत सुरू राहील. यामध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुरुस्तीसाठी थांबलेल्या लालपरीला अचानक आग

लॉकडाउनमुळे गेल्या तीन महिन्यापासून राहूचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता उद्यापासून कडकडीत आठ दिवस गाव बंद राहिल. याबाबत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले आहे. राहू परिसरातील प्रतिबंधित कार्यक्षेत्रामध्ये राहू, पिंपळगाव, टेळेवाडी, पिलाणवाडी सोनवणे मळा, उंडवडी, डुबेवाडी या गावातील व्यवहार देखील पूर्णपणे बंद राहणार असल्याचे महसूल विभागाचे अधिकारी व्ही. एस. धांडोरे, अर्जुन स्वामी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight days public curfew in these villages in Daund from tomorrow