पुरंदर तालुक्यात कोरोनाचा आठवा बळी

श्रीकृष्ण नेवसे
मंगळवार, 14 जुलै 2020

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा आठवा मृत्यू सासवड शहरातील व्यक्तीचा झाला. तर, शहरात आज रेकॉर्ड ब्रेक करत तब्बल 21 रुग्ण वाढले

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात कोरोनाचा आठवा मृत्यू सासवड शहरातील व्यक्तीचा झाला. तर, शहरात आज रेकॉर्ड ब्रेक करत तब्बल 21 रुग्ण वाढले.     

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

सासवडसह पुरंदर तालुक्यात आज मागचे रेकॉर्ड ब्रेक करत तब्बल 35 रुग्ण कोरोना रुग्ण सापडले. त्यातून तालुका 253 वर पोचून धोका वाढतोय. तर आज सासवड शहरातील 21 रुग्णांसह एकटे शहर 154 वर पोचून उद्यापासून शिथील केलेला लाॅकडाउन महागात पडेल का, अशी शंका निर्माण झाली आहे. दुसरीकडे नागरिकांना सेवाही पाहिजेत व व्यापारी-  व्यावसायिकांचे अर्थचक्रही चालले पाहिजे, असे अनेकांचे मत आहे.

जुन्नरमधील कोरोनाबाधितांसाठी एक हजार बेडची व्यवस्था

दरम्यान, तालुक्यातील कोरोनाबाधीत गावे 32 वर पोचून ग्रामीणमध्येही धाकधूक वाढतच आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मोठे प्रयत्न ग्रामीणमधील ग्रामपंचायतींना हाती घ्यावे लागतील. सासवड शहरातील लाॅकडाउन उद्या (ता. 15) थोडा शिथील होताना गर्दी केली तर प्रशासन कारवाई करेल. 
    
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighth victim of Corona in Purandar taluka