esakal | खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी अनुपस्थित असणारे अजित पवार म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी अनुपस्थित असणारे अजित पवार म्हणतात...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. असे असले तरी ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित, सुरळीत सुरु आहे. नेहमीप्रमाणेच त्यांचा कामाचा धडाका सुरू आहे. 

खडसेंच्या पक्षप्रवेशावेळी अनुपस्थित असणारे अजित पवार म्हणतात...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. 

आवश्य वाचा- खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक पत्रक काढून एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले आहे. आरोग्याच्या कारणास्तव अजित पवार आजच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहू शकले नाहीत. 

पत्रकांत म्हटल्याप्रमाणे, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे. खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. माननीय खडसेसाहेब, माननीय रोहिणीताई खडसे, त्यांच्यासोबत पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी, समस्त कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये हार्दिक स्वागत. पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो. पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा. अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचे पत्रक काढून स्वागत केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले आहे. असे असले तरी ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित, सुरळीत  सुरु आहे. 

आवर्जून वाचा- सरपंच ते महसूलमंत्री अशी स्वयंभू खडसेंची वाटचाल !

अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत व्हीसीद्वारे सहभाग घेतला. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन कामकाजाचा आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या सूचनाही त्यांनी दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात पक्षप्रवेश झाला. खडसे यांनी बुधवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे व कार्यकत्यांॆसह आज राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. 

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top