esakal | दापोडे येथील खुनी हल्ल्यातील ज्येष्ठाचा मुत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दापोडे येथील हल्ल्यातील ज्येष्ठाचा मुत्यू

sakal_logo
By
मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे (पुणे) : ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन दापोडे ( ता. वेल्हे ) येथील वैद्यवाडी येथे लोंखडी फावड्याने केलेल्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक दगडू वैद्य (वय ६०, रा. वैद्यवाडी , दापोडे) यांचा रविवारी (ता. १८) पुण्यात खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मुत्यू झाला. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी हल्लेखोर रूपेश सुनील देशपांडे (वय २६ ,रा. वैद्यवाडी, दापोडे) याच्या विरोधात रात्री उशिरा खुनाचा दाखल केला आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड बंद होणार सांगून, आजोबांची पावणे दोन लाखांची फसवणूक

या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा राजेंद्र अशोक वैद्य यांनी फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ४ एप्रिल रोजी वैद्यवाडी येथे ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीजवळ घडला. आरोपी रुपेश देशपांडे हा टाकीतील पाण्याची लाईन कापून पाण्याचे कनेक्शन घेत होता. त्यावेळी मयत अशोक वैद्य यांनी त्याला विरोध केला. माझ्या लाईनमधून कनेक्शन घेऊ नको, तुझ्या लाईनमधून कनेक्शन घे असे अशोक वैद्य यांनी सांगितले. त्यावेळी चिडून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करत रूपेश देशपांडे याने अशोक वैद्य व भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या त्यांचे नातू प्रज्वल विक्रम वैद्य (वय-१२) यांच्यावर लोंखडी फावड्याने जोरदार हल्ला केला. त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. वेल्हा पोलिसांनी या प्रकरणी ५ एप्रिल रोजी आरोपी रूपेश यास अटक केले आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार तपास करत आहेत.

हेही वाचा: आरोग्य सुविधांचे सर्व तालुक्यांना समन्यायी वाटप करा : विजय शिवतारे