Loksabha Election : ज्येष्ठांच्या मतदानासाठी मोठी कसरत ; साडेतीन लाख जणांना पुरवावी लागणार सुविधा

आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
Loksabha Election
Loksabha Electionsakal

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे पुण्यासह जिल्ह्यातील साडेतीन लाख नागरिकांना ही सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय आयोगाने उपलब्ध करून दिला होता. सुमारे ५५० ज्येष्ठांकडून त्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. या निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता आयोगाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांना घरी बसून अथवा मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे, असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत.

Loksabha Election
Pune Rain : पुण्याला पावसाचा दणका! राज्यात पुन्हा बरसणार अवकाळीचा तडाखा; 'या' जिल्ह्यांत पावसासह गारपीटीचा इशारा

काय आहेत बंधने...

  •  पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याकडून १२ ‘ड’ अर्ज भरून घ्यावा लागणार

  •  निवडणुकीचा अध्यादेश आल्यानंतर पाच दिवसांत अर्ज भरून घेणार

  •  ज्येष्ठांनी घरीच मतदानाचा पर्याय निवडला तर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, बूथ प्रमु आणि कर्मचाऱ्यांना मतदान घ्यावे लागणार

  •  संबंधित नागरिकांच्या घरी बूथ केंद्र उभारावे लागणार

  •  मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण करावे लागणार

  •  पोलिस बंदोबस्तात नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत मतदान घ्यावे लागणार

  •  ज्येष्ठ मतदानास सक्षम नसतील, तर त्यांच्या घरातील १८ वर्षांवरील कोणत्याही एका नागरिकाचा अर्ज भरून घेणार

  •  मतदान गुप्त ठेवण्याची जबाबदारी नायब तहसीलदारांबरोबरच संबंधित मतदारांवरही राहणार

  •  ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी कोणत्या मार्गाने ही टीम जाणार आहे, तो मार्ग निश्‍चित करून आयोगाबरोबरच सर्व राजकीय पक्षांना त्यांची माहिती द्यावी लागणार

निवडणूक आयोगाने हा पर्याय उपलब्ध करून दिला असला, तरी ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, यावर आमचा भर राहणार आहे. युवा पिढीला मतदान करण्याबाबतचा संदेश देणे, हा त्यामागील उद्देश आहे.

- अजय मोरे,

अतिरिक्त जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com