esakal | वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येक गावात विद्युत किंवा गँस शवदाहिनी उभारावी : शिवाजीराव आढळराव पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

adhalrao patil

वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येक गावात विद्युत किंवा गँस शवदाहिनी उभारावी : शिवाजीराव आढळराव पाटील

sakal_logo
By
डी. के वळसे-पाटील

मंचर : “कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने अंत्यविधीसाठी लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक गावात विद्युत दाहिनी किंवा गँस शवदाहिनी उभारावी. या मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे.” असे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे : 115 केंद्रावर लसीकरण, येेथे मिळणार कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन

मंचर (ता. आंबेगाव) येथे आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत ७५ लाख रुपये निधी एलपीजी गॅस शवदाहिनीसाठी मंजुर झाला. सदर कामाचे भुमीपुजन तपनेश्वर स्मशानभुमीत आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेशराव भोर, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच किरण राजगुरु, उपसरपंच युवराज बाणखेले, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे, निघोटवाडीचे सरपंच नवनाथ निघोट, राजु इनामदार, वसंतराव बाणखेले, सागर काजळे, प्रवीण मोरडे, राजेंद्र थोरात, मंगेश बाणखेले व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे-नाशिक दीड तासांत! हाय स्पीड रेल्वेसाठी जमीन अधिग्रहण

आढळराव पाटील म्हणाले, “ कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे प्रत्येक गावात मृत्यू च्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सरपणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी प्रत्येक गावात गँसदाहीनी किवा विद्युत दाहीनीची मागणी आहे. हा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत महत्वाचे आहे.” देवेंद्र शहा म्हणाले “मंचरच्या तपनेश्वर भूमीत जुन्या लोखंडी स्मशानभुमीची दुरवस्था झाली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीसाठी आठ ते दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून स्मशानभुमी अद्यावत करण्यात येणार आहे.” दरम्यान लिंगायत समाजाच्या दफनासाठी मंचर ग्रामपंचायतीने जागा द्यावी अशी मागणी लिंगायत समाजाचे नेते बंडू महाजन, किरण महाजन यांनी शिवाजीराव आढळराव पाटील व देवेंद्र शहा व ग्रामपंचायतीकडे केली. या दोन्ही नेत्यांनी याबाबत सरपंच व उपसरपंच यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त