esakal | अकरावी सीईटीची हेल्पलाइन ‘हेल्पलेस’
sakal

बोलून बातमी शोधा

date declare of CET examination

अकरावी सीईटीची हेल्पलाइन ‘हेल्पलेस’

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेश (Eleventh Admission) परीक्षेसाठी घोषित हेल्पलाइन क्रमांकांपैकी पुणे (pune), मुंबई (mumbai)आणि कोल्हापूरचे (kolhaur) हेल्पलाइन क्रमांक बुधवारी दिवसभर ‘स्विच ऑफ’ (switch off) आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा मनस्ताप तर सहन करावा लागला. अकरावीच्या सामाईक प्रवेश परीक्षेतील (CET) अडचणींसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Msbshse) वतीने विभागवार संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी घोषित करण्यात आले आहे. (Eleventh standard CET helpline Helpless)

मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ही सामाईक प्रवेश प्रक्रिया घेण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठीची ही परिक्षा २१ ऑगस्टला पार पडेल. त्यासाठी दहावी उत्तीर्ण इच्छूक विद्यार्थ्यांना ‘http://cet.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. यात येणाऱ्या अडचणींसाठी मंडळाच्या वतीने विभागवार हेल्पलाइन क्रमांक घोषित करण्यात आले आहे.

‘सकाळ’ने (sakal)सर्व विभागांत फोन लाऊन क्रमांक चालू आहे का नाही, विद्यार्थ्याचे फोन आले का नाही किंवा त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मुंबई आणि पुण्यातील फोन बंद असल्याचे समोर आले आहे. यासंबंधी आम्ही राज्य मंडळाच्या सचिवांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण संबंधित फोन उचलला गेला नाही. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

हेही वाचा: भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर हल्ला, मुढाळे येथील घटना

हेल्पलाइनच सद्यःस्थिती :

विभागीय मंडळ मोबाईल क्रमांकाची स्थिती

१) पुणे - क्रमांक बंद

२) नागपूर - क्रमांक चालू, पुण्यातील पालकांचे फोन

३) मुंबई - क्रमांक बंद

४) औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातुर, कोकण - क्रमांक चालू

६) कोल्हापुर - क्रमांक बंद

हेही वाचा: कात्रजमध्ये राज्यातील पहिले शेकरू प्रजनन आणि रानमांजर केंद्र

विषयांच्या निवडीसंदर्भातील अडचणीसाठी आम्ही सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील हेल्पलाइन क्रमांकावर विभागीय मंडळाला फोन लावला. पण क्रमांक नॉट रिचेबल होता. दिवसभर आम्ही प्रयत्न केला पण काही यश आले नाही. शेवटी नागपूरच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला.

- पालक

loading image