पुण्यातील गुंडगिरी संपविणार

abhinav deshmukh.jpg
abhinav deshmukh.jpg

मंचर (पुणे) : “पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुंडगिरी व वाळूमाफियांची दहशत कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी धडक कारवाईचे सत्र राबविले जाईल. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेली सेवा पोलिस खात्याकडून दिली जाईल,” अशी ग्वाही पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. 

मंचर (ता. आंबेगाव) येथे कोविड बैठकीनिमित्त देशमुख आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पोलिस अधिकारी व अनेक पोलिस कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वच पोलिस अधिकारी व पोलिसांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना आयुर्वेदिक औषधाबरोबरच प्रेरणा प्रोत्साहन मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातील.

पोलिस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता व पोलिसांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील. हॉटेल, परमीट रूम सुरु झाल्यानंतर मास्क, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टन्स, इन्फ्रा थर्मामीटर गनने तापमान मोजणे याबाबत शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com