esakal | पुणे : 'पीसीडीए'मध्ये 'टी-५५ टॅंक' युद्ध स्मारकाची स्थापना!
sakal

बोलून बातमी शोधा

T55_Tank

पीसीडी(ओ)च्या कार्यालयात, 'टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना होणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे स्मारक आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करेल.

पुणे : 'पीसीडीए'मध्ये 'टी-५५ टॅंक' युद्ध स्मारकाची स्थापना!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्याच्या प्रधान नियंत्रक संरक्षण लेखा कार्यालयाच्या (पीसीडीए) परिसरात गुरुवारी (ता.२२) ‘टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण लेखा विभागाचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक संजीव मित्तल यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. पीसीडीएचे डॉ. निरुपमा काजला, मयंक शर्मा, एनडीएएसचे संचालक मिहीर कुमार आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Breaking : आडोशी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक संथ गतीने!​

पुण्यातील पीसीडीए ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या (वित्त) अखत्यारीतील संरक्षण लेखा विभाग (डीएडी) या संस्थेची पथदर्शी संघटना आहे. या संघटनेकडे भारतीय लष्करातील 53 हजाराहूनपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते देणे तसेच, पूर्व लेखा परीक्षण अशा जबाबदारी आहेत.

यावेळी बोलतांना संजीव मित्तल म्हणाले, "पीसीडीएच्या (ओ) कार्यालय परिसरात ‘टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना होणे, हे लष्कर आणि संरक्षण लेखा विभागातील एकात्मीकृत भावनेचे प्रतीक आहे. लष्कराने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना संरक्षण लेखा विभाग दाखवत असलेली कार्यक्षमता महत्वाची आहे. 

पाकिस्तानच्या चौघांना भारतीयत्व बहाल; पिंपरी-चिंचवडमध्ये आहे वास्तव्य!​

"पीसीडी(ओ)च्या कार्यालयात, 'टी-55 टॅंक' या युद्धस्मारकाची स्थापना होणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे स्मारक आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील आणि आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करेल. कोरोनाच्या काळातही पीसीडीए मार्फत देशभरातील लष्करी अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ता, तसेच निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचे थकीत मानधन वेळेत देण्याचे कार्य करण्यात आले होते. तसेच भविष्यातही लष्करी अधिकाऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी पीसीडीए नेहमी तत्पर असेल," असे डॉ. काजला यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image