देशातील सर्वांना भारतीयपण जपण्याचे शिक्षण द्यायला हवे : प्रभा अत्रे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते.

पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले-वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण, आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दी रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'अत्रे' पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस आदी उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना 'गुरुवर्य आबासाहेब अत्रे' पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना 'इंदिरा आबासाहेब अत्रे' पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

- पामेला अँडरसनचे पंतप्रधान मोदींना पत्र 

भोंडे म्हणाले, ''शिक्षकांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठीदेखील योगदान देता येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होत आहेत.'' 

- दादा म्हणाला, 'धोनीबाबत आमचं पण ठरलंय!' 

चाफेकर म्हणाले, ''सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही.'' 

- युवा क्रिकेटपटूंनो, राहुल द्रविड सांगतोय मानसिक आरोग्याचे महत्त्व!

मी वेश्‍यांच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण, रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. निहार बंद करावे लागणार आहे. परंतु, आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. साडेचारशे महिला घरातील कर्त्या झाल्या आहेत. 
- विलास चाफेकर, संस्थापक, वंचित विकास संस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone should teach to became Indian first says Prabha Atre