महत्वाची बातमी : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय परिक्षांबाबत केला मोठा खुलासा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

वैद्यकीय शिक्षण कायद्यात परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा नियम नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जाणार आहे.

पुणे : वैद्यकीय शिक्षण कायद्यात परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा नियम नाही. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहे तेथेच त्यांची परीक्षा घेतली जाईल, यासाठी प्रवास करावा लागणार नाही, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

अबब! शिवाजीनगर स्टेशनच्या रुळावर दिसला अजगर मग...

पुण्यातील 'कोरोना' स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अमित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यावेळी उपस्थित होत्या.

राज्यात विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा राज्य सरकारने परीक्षा रद्द केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातच अमित देशमुख यांनी मुंबईत कोश्यारी यांची भेट घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा आराखडा सादर केला.

सरकार एक असताना परीक्षेसाठी वेगवेगळ्या भूमिका असल्याबद्दल देशमुख म्हणाले, "उच्चतंत्र शिक्षण विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग हे दोन्ही स्वतंत्र विभाग आहेत, त्यांचा अभ्यासक्रम, विद्यापीठही भिन्न आहे. उच्च व तंत्र शिक्षणात परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याची जी मूभा आहे, ती वैद्यकीय शिक्षणासाठी नाही. आम्ही तयार केलेला परीक्षेचा आराखडा राज्यपालांनी मान्य केली आहे. १५ जुलै ते ३० आॅगस्ट दरम्यान परीक्षा घेतल्या जातील. 

न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अखेर मिळणार दिलासा पण...

या काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे, कोणत्याही विद्यार्थ्यांला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाची गरज नाही. विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहे, तेथेच परीक्षा घेतली जाईल.  

दरम्यान, इतर विद्यार्थ्यां प्रमाणे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा रद्द करा अशी मागणी विद्यार्थी करत असले तरीही याकडे सरकारने लक्ष दिले नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

'नवले रुग्णालयाच्या प्रकरणात लक्ष घालू'
नवले रुग्णालयात गेले सहा महिने नर्स व इतर कर्मचार्यांचा पगार झालेला नाही, त्यामुळे तेथील कर्मचार्यांनी आंदोलन केले होते, याबाबत लक्ष घातले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The exam will be held wherever the student is says Amit Deshmukh