इंदापूर : शेतातील विहिरीत मगर आढळून आल्याने उडाली खळबळ

लोणी देवकर जगतापवस्ती येथील शेतकरी नितीन शिपकुले यांच्या भावडी (ता. इंदापूर) हद्दीत असलेल्या शेतातील विहिरीत मगर आढळून आल्याने खळबळ उडाली.
Crocodile
CrocodileSakal

इंदापूर - लोणी देवकर जगतापवस्ती येथील शेतकरी नितीन शिपकुले यांच्या भावडी (ता. इंदापूर) हद्दीत असलेल्या शेतातील विहिरीत मगर आढळून आल्याने खळबळ उडाली.

नितीन शिपकुले यांना काही दिवसापासून आपल्या विहिरीमध्ये मगरीचेअस्तित्वअसल्याचे जाणवत होते. मात्र त्यांना ती प्रत्यक्षदिसली नव्हती. मात्र दि. १ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी विहीर खोलीकरण काम करण्यासाठी पोकलान मशीन बोलावले.काम सुरू करण्यापुर्वी त्यांनी पाण्याचा अंदाज घेण्यासाठी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना पाण्यात मगर दिसून आली. त्यांनी ही माहिती दीपक जगताप यांनादिली.दोघांनी ही माहिती तात्काळ वनविभागास दिली. त्यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी अजितसूर्यवंशी ,जंक्शन वनपाल अशोक नरुटे, वनरक्षक श्री. बागडे, वनकर्मचारी अमोल मारकड, राजू पवार, रणजित कारंडे, आप्पा देवकाते यांनी भावडी येथे धाव घेवून पाण्यात मगर असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यांनीयाची सूचना पुणे आपत्ती व्यवस्थापन विभागास दिली असून हे पथक पुणे येथून इंदापूर ला निघाले आहे.

Crocodile
पुणे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप

तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या मार्ग दर्शनाखाली त्यांनी पाणी उपासण्यास सुरुवात केली. मात्र सदर विहीर ही भीमा नदीपासून अंदाजे २ ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे विहिरीतून पाणी उपसले तरी विहीर लगेच भरत आहे. त्यामुळे प्रथम विहीरीतील पाणी उपसून मगरीस सुरक्षित बाहेर काढणे व त्यानंतर विहिरीतील गाळ काढून विहिरीचे खोलीकरण करणे यापद्धतीने युद्धपातळीवरून कार्य सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com