esakal | पर्यटनातून जैव विविधता अनुभवावी - रवींद्र वायाळ । biodiversity
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनातून जैव विविधता अनुभवावी - रवींद्र वायाळ

पर्यटनातून जैव विविधता अनुभवावी - रवींद्र वायाळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलवडे : निसर्गाचे वरदान लाभलेल्या हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभा धरण) परिसरात निसर्ग पर्यटन आणि साहसी पर्यटनाला चांगलाच वाव आहे. शहरी पर्यटकांनी या परिसराला भेट देऊन येथील जैव विविधता अनुभवावी असे आवाहन आय. आर. बी. चे सरव्यवस्थापक रवींद्र वायाळ यांनी केले.

हेही वाचा: सफाई कामगाराची मुलगी बनली 'तहसीलदार'

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सोशल मिरर, महाराष्ट्र पर्यटन संचनालय आणि आंबेगाव तालुका कृषी विभाग यांच्या वतीने नेचर वॉक आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रवींद्र वायाळ बोलत होते. कृषी साहायक अरविंद मोहरे आणि बंधू मोहरे, कृषी सहाय्य्क विठ्ठल तळपे, उद्योजक सागर हागवणे, वैभव डामसे, सौ दया शेजवळ, शुभम बिडकर, जयवर्धन वायाळ, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आदिनाथ आणि सकाळचे पत्रकार सुदाम बिडकर उपस्थित होते.

हेही वाचा: एसटीत विसरलेली बॅग सापडली पीएमपीएमएल बसमध्ये

आंबेगाव तालुक्यातील भविष्यातील पर्यटन, त्यासाठी आवश्यक सुविधा, पर्यटन व्यवस्थापन, वनस्पती, पशु पक्षी, औषधी वनस्पती जीवन आणि आदिवासिंची संस्कृती यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. अरविद मोहरे यांनी जैव विविधतेची आणि स्थानिक संस्कृतीची माहिती दिली. तीन ते चार किमी चा नेचर वॉक करण्यात आला. सौ शेजवळ, वैभव डामसे आणि विठ्ठल तळपे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तालुक्याला पर्यटनाच्या यशोशिखरावर नेण्यासाठी पर्यटन दिन साजरा करण्यात आला असे मोहरे यांनी सांगितले. आभार सुदाम बिडकर यांनी मानले.

loading image
go to top