पुण्यात कम्युनिटी थिएटरचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कम्युनिटी थिएटर वा लहान जागेत प्रायोगिक नाटके करण्याची ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित राहू नये, तर हे प्रयोग गावागावांत झाले पाहिजेत. अनेक मोठ्या सोसायट्यांमध्येही हे प्रयोग होऊ शकतील.
- अतुल पेठे (नाट्य दिग्दर्शक)

पुणे - अतुल पेठे म्हणजे प्रायोगिक रंगभूमी आणि अर्थवाही नाटकातील नाव. आता दिग्दर्शक पेठे यांचा सुरस आणि चमत्कारिक खेळ ’शब्दांची रोजनिशी’तून रंगमंचावर येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, कोथरूडमधील सजग रंगमंच नवविनायक सोसायटीमध्ये या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यातून कम्युनिटी थिएटरचा प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाटक करू पाहणाऱ्या आणि नाटक पाहू इच्छिणाऱ्या रसिकांसाठी हा प्रयोग केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सविताभाभी...तू इथंच थांब! पुण्यातील होर्डिंगची चर्चा

प्रयोगशील आणि हौशी कलावंतांना नेहमी व्यासपीठ देण्याचा प्रयत्न पेठे यांनी केला आहे. आता रामू रामनाथन या लेखकाची कलाकृती घेऊन ते रंगमंचावर धमाल विनोद करण्यास सज्ज झाले आहेत. रामनाथन यांच्या मूळ कथेचा अनुवाद हा अमर देवगावकर यांनी केला आहे. स्वत: अतुल पेठे आणि केतकी थत्ते हा रंगमंचीय आविष्कार साकारणार आहेत. हितोपदेश वा पंचतंत्राच्या पठडीतील हे नाटक आहे. त्याबद्दल पेठे सांगतात, ‘गेली काही वर्षे नाटकांवर प्रयोग करीत आहे. हाही वेगळा आणि अनुभव देण्या-घेण्याचा प्रयोग आहे. सुरस आणि चमत्कारिक अशा दोन कथांमधून धमाल, गंमत-जंमत रसिकांना अनुभवता येईल. सलग दीड तासाचे हे नाटक आहे, नव्या वाटेवरचा हा खेळ आहे. संवाद, ध्वनी आणि संगीताचा मेळ यात घातला आहे. कथा वेगळी आहे, भाषेच्या रचनेतील गमती-जमती यात आहेत.’

पुण्यात राज ठाकरे यांनी घेतली बाबसाहेब पुरंदरे यांची भेट: या मुद्दयांवर झाली चर्चा 

पेठे यांनी सांगितले, की कम्युनिटी थिएटरची कल्पनाही रुजवीत आहोत. यामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांत नाटकांसाठी छोट्या जागा उपलब्ध होतील. मोठ्या नाट्यगृहांसाठी अडून बसायचे नसल्याने नाटक लोकांजवळ जाईल आणि रसिकांचा प्रवासाचा वेळही वाचेल. यात व्यावसायिक हेतूच नाही. केवळ प्रयोग व्हावा, लोकांनी नाटक पाहावे आणि त्यातून नाट्यरसिक तयार व्हावा हा उद्देश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Experience community theater in Pune