esakal | MPSCच्या परीक्षेला सामोरं जाण्याआधी...; आंदोलनानंतर उमेदवारांना तज्ज्ञांच्या टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC_Protest

१४ मार्चची परीक्षा वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाचा बांध फुटला आणि हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले.

MPSCच्या परीक्षेला सामोरं जाण्याआधी...; आंदोलनानंतर उमेदवारांना तज्ज्ञांच्या टिप्स

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : परीक्षा तोंडावर आलेली असताना रद्द झालेली परीक्षा पुन्हा घ्या म्हणून हजारो विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. कोरोनामुळे तणावात असताना त्यात अनिश्चिततेची भर पडली. मात्र, आता परीक्षा आठवड्याभराने नक्की होणार असल्याने इतर कोणत्याही विषयात लक्ष न घालता प्रसन्न रहा, शांत चित्ताने रिव्हीजन करा. जो भाग राहिला आहे त्यावर भर द्या आणि २१ मार्चच्या परीक्षेला सामारे जा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

गेल्या वर्षभरात पाच वेळा कधी कोरोना तर कधी आरक्षणाचा पेच अशामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी संयुक्त पूर्व परीक्षा, अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली जात होती. त्यामुळे उमेदवारांचे आर्थिक शैक्षणिक नुकसान होत होतेच. शिवाय अनेकांना ऐजबार होण्याचा धोका वाटत असल्याने हे विद्यार्थी प्रचंड तणावात होते. १४ मार्चची परीक्षा वाढत्या कोरोनामुळे पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांच्या संतापाचा बांध फुटला आणि हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. त्यामुळे आता ही झालेली परीक्षा २१ मार्च रोजी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, पण या शेवटच्या आठवड्याचा सदुपयोग करा, अशा टिप्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी दिल्या आहेत.

'लोकसेवा आयोग परीक्षेचा विषय हाताळण्यात कमी पडला'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी​

‘‘राज्य सेवा परीक्षा एक आठवडा पुढे गेल्याने तयारीसाठी आणखी एक संधी मिळाली आहे असे विद्यार्थ्यांनी समजावे, तणावात न राहात प्रसन्न मनाने अभ्यास करावा. शेवटच्या आठवड्यात सी-सॅटचे एमसीक्यू सोडविण्यावर भर द्यावा.’’
- अविनाश धर्माधिकारी, प्रमुख, चाणक्य मंडल परिवार

‘‘शेवटचा टप्पा असल्याने या काळात पूर्वी जो अभ्यास केला आहे, त्याचे व्यवस्थित रिव्हीजन करावे, नवे वाचन करून त्यात वेळ घालवू नये. पूर्व परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी सी-सॅटचा पेपर विषय महत्त्वाचा आहे. त्यावर भर दिला पाहिजे. भारतीय राज्यघटना, भूगोल, अर्थशास्त्र यावर भर द्यावा.’’
- डॉ. सुशिल बारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

‘‘पदांची संख्या, परीक्षेतील मेरिट याचा विचार करू न करता प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करा. अभ्यास केलेले परीक्षेत आठवेल का असा विचार न करता रिव्हीजनवर भर द्या.’’
- मनोहर भोळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

- हेही वाचा - 'धीर धरा...' तरुण महिला अधिकाऱ्याचं MPSCच्या उमेदवारांना आवाहन

याकडे लक्ष द्या
- परीक्षेच्या काळात जास्त वेळ जागरण न करता झोप पूर्ण झाली पहिजे.
- रोज पाच तास सी-सॅट आणि पाच तास रिव्हीजनसाठी वेळ द्या, दोन तास जुन्या प्रश्‍नपत्रिका सोडवा.
- ऊन वाढत आहे, त्यासाठी पाणी सतत प्यावे, फळं खावीत.
- सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका.
- परीक्षेच्या दिवशीही कमी आहार ठेवावा म्हणजे आळस येणार नाही.
- अभ्यास झाला आहे, पण पेपर कसे  देता हे महत्त्वाचे असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top