
मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अटी-शर्तींचं उल्लंघन झाल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. हायकोर्टाकडून जरांगे आणि वीरेंद्र पाटील यांना नोटीसही बजावण्यात आलीय. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकाही सुरू आहेत. हायकोर्टातील सुनावणी आणि उपसमितीच्या बैठकीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. तर आंदोलनात अटी-शर्थींचं उल्लंघन झालंय. यावर कोर्टाने दखल घेऊन कारवाईचे आदेश दिलेत. त्यामुळे प्रशासनाला कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करावी लागेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.