फडणवीस म्हणतात, 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; यावर उपस्थित म्हणतात....

Fadnavis says I will come again I will come again in Pune
Fadnavis says I will come again I will come again in Pune

स्वारगेट : दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी " मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' सांगताच "तुम्ही पुन्हा या, पुन्हा या, आम्ही वाट पाहत आहोत,' अशा शब्दात उपस्थितांनी देखील दाद दिली. त्यामुळे पुरस्काराचा कार्यक्रम संपल्यानंतरही सभागृहात हा एकच विषय चर्चेचा झाला होता.

निमित्त होते आधार सोशल फाऊंडेशनतर्फे "भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी' यांच्या स्मरणार्थ पहिला "अटलशक्ती पुरस्कार' वितरणाचे. या कार्यक्रमात जनसेवा बॅंकेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजेंद्र हिरेमठ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी पुन्हा येणाचे सुतोवाच केले. हे सुतोवाच करताना "अटलजींच्या नावाचा हा पुरस्कार दिला जात आहे. त्यामुळे पुढील वर्षी देखील मी या कार्यक्रमाला पुन्हा येईन,' असे स्पष्ट केले. परंतु सभागृहातील उपस्थितांनी " तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परत या कार्यक्रमाला या' असे जोषात सांगितले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख अनिरुद्ध देशपांडे, भाजपच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी आमदार दिलीप कांबळे, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक दिलीप काळोखे यांसह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी लाकडावरील कोरीवकाम करणारे ठाकूर बंधू, फुलांची सजावट करणारे सरपाले बंधू, वाद्य प्रशिक्षण देणारे संजय करंदीकर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ.संतोष भन्साळी, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर यांना "अटल शक्ती पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडून 'ही' नावे निश्चित

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जगामध्ये सन्मान आहे. त्याची मुहूर्तमेढ अटलजींच्या नेतृत्वाच्या वेळी रोवली गेली. अणू चाचणीच्या वेळी इतर देशांसमोर भारत झुकणार नाही, हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिले होते. त्यामुळे त्यावेळी जगाला अटलजींच्या व भारताच्या नेतृत्वाची शक्ती समजली होती,' अशा शब्दांत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडले.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी 'या' आहेत महत्वाच्या दहा टिप्स

अनिरुद्ध देशपांडे यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. तर डॉ.राजेंद्र हिरेमठ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी दिलीप काळोखे यांनी प्रस्ताविक केले. तर पराग ठाकूर, विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com