बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यात राष्ट्रवादीला अपयश

बारामती येथील बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही निवडणूक बिनविरोध करणे शक्य झाले नाही.
baramati bank
baramati banksakal

बारामती - येथील बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही निवडणूक बिनविरोध करणे शक्य झाले नाही.

काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजय भिसे यांनी खुल्या प्रवर्गा सह अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये आपला अर्ज कायम ठेवला. तसेच त्यांची कन्या डॉ. प्रतीक्षा भिसे यांचा अर्ज महिला प्रवर्गात कायम राहिल्यामुळे बारामती सहकारी बँकेची निवडणूक होणार आहे.

baramati bank
बारामती शहरात विनापरवानगी जाहिराती लावल्यास कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार रोहित घनवट हे इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून तर उद्धव गावडे हे भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून बिनविरोध निवडून गेले. उर्वरित 13 जागांसाठी 16 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे बारामती सहकारी बँकेची निवडणूक होणार हे आज स्पष्ट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या इतर सर्व उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र डॉ. विजय भिसे यांनी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com