पिंपरी : गॅस शेगडीत बिघाड असल्याचे भासवून पैसे उकळणारे दोघे ताब्यात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

गॅस शेगडी तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वडगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

पिंपरी : गॅस शेगडी तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वडगाव पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.

या परिसरातील रहिवासी अभिजित मोरे, शिवाजी पवार, योगेश कुमार, राजेश मेमाणे, भीमराव मोरे, अविनाश ढोरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, या तक्रारीनंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.  

गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील वडगाव शहर व परिसरात एचपी कंपनीचा गणवेश परिधान करून व कंपनीचे ओळखपत्र जवळ बाळगून काही मेकॅनिक गॅस शेगडीच्या तपासणीच्या नावाखाली फिरत आहेत. ते शेगडीचे व्हॉल्व्ह खराब झाल्याचे सांगून बाराशे ते पंधराशे रुपये उकळतात. 

औरंगाबाद : तो बोलत होता दुसरीशी फोनवर, पत्नीने गुप्तांगावर चाकू खुपसून केला खून

या परिसरात काल (गुरुवार) हा प्रकार झाला. मोरे यांना शंका आल्याने त्यांनी अधिकृत गॅस शेगडी मेकॅनिकला बोलावून खात्री केली. त्यातूनच हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. त्यांनी दोघा जणांना पोलिसांच्या हवाली केले. काही मेकॅनिकांनी मात्र शहरातून पोबारा केला. 

सावधगिरी बाळगावी

घरी येणाऱ्या मेकॅनिकबाबत गॅस एजन्सीकडे चौकशी करूनच त्याला घरात प्रवेश द्यावा. अधिकृत सर्व्हिस सेंटरकडूनच शेगडीची तपासणी व दुरुस्ती करून घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Fake Gas Mechanic Captured by Police in Pimpri