Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; आंबेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार

घराच्या बाहेर अंगणात गायींच्या दावणीजवळ झोपलेल्या ६५ वर्षाच्या खंडू दारकु खिलारी या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे,या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला जखमा झाल्या असून त्यांच्यावर पारगाव ता.आंबेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Leopard Attack
Leopard AttackSakal

निरगुडसर : घराच्या बाहेर अंगणात गायींच्या दावणीजवळ झोपलेल्या ६५ वर्षाच्या खंडू दारकु खिलारी या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे,या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला जखमा झाल्या असून त्यांच्यावर पारगाव ता.आंबेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना मंगळवार (ता.०९) रोजी रात्री साडेदहा वाजता भराडी (ता.आंबेगाव) येथील चौफुला वस्तीवर घडली. भराडी-थोरांदळे रस्त्यावर चौफुला वस्तीवर खंडू दारकू खिलारी हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात,ते नेहमी प्रमाणे मंगळवार (ता.०९) रोजी रात्री घराच्या बाहेर अंगणात झोपले होते.ज्या अंगणात झोपले होते त्या अंगणाला खेटून त्यांचा पुतण्या बाबाजी जनाशेठ खिलारी यांच्या गायांची दावण आहे.

रात्री साडेदहा वाजता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक खंडू दारकु खिलारी यांच्यावर हल्ला केला,यावेळी शेतकऱ्याने आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली,या हल्ल्यात खिलारी हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, जखमी झालेल्या खंडू खिलारी यांना तातडीने मंगळवारी रात्री पारगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,

आता बुधवारी सकाळी त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांना लस दिली जाणार आहे. शेतकऱ्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तातडीने पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली परंतु रात्री तर सोडाच सकाळ पर्यंत कुणी अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी फिरकला नाही. चौकट:माणूस मेल्यावर पिंजरा लावणार का?

.... दोन दिवसांपूर्वी याच चौफुला वस्तीजवळ कांताराम खिलारी,कैलास गाडेकर व भाऊ खिलारी हे बारा वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरून दुचाकी वरून जात असताना अचानक त्यांच्या समोरून बिबट्याने झेप घेतली होती.तसेच

सव्वा महिन्यापूर्वी याच चौफुला वस्तीवरील खंडू बबन खिलारी यांचा कालवडीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला होता यावेळी येथील नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभागाने काही पिंजरा लावला नाही. माणूस मेल्यावरच वनविभाग पिंजरा लावणार का? असा सवाल उपस्थित राहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com