वाजेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Leopards
Leopardssakal

शिक्रापूर : वाजेवाडी (ता.शिरूर) येथील भोंडवेवस्तीतील नारायण सरडे यांचेवर आज (ता.०२) सकाळीच बिबट्याने हल्ला केला. ग्रामस्थ सतर्क असल्याने सरडे या हल्ल्यात गंभीर जखमी होवूनही बचावले. मात्र तब्बल आठ दिवस मागणी करुनही वनखात्याकडून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध झाला नसल्याने ग्रामस्थ आता संतप्त झाले असून वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

ऊसक्षेत्र प्रचंड वाढलेल्या वाजेवाडी परिसरात बिबट्या वावरत असून तातडीने पिंजरा उपलब्ध करुन देण्याची मागणी गेल्या आठ दिवसांपासून वाजेवाडीचे सरपंच मोहन वाजे व ग्रामस्थ करीत आहेत. मात्र ग्रामपंचायतीचा ठराव द्या म्हणत वनखात्याने ग्रामस्थांना तब्बल आठ दिवस घोळविले असतानाच आज (ता.०२) सकाळी साडे आठच्या सुमारास भोंडवेवस्तीवरील गोपीचंद भोंडवे यांच्या विहीराजवळ आपल्या शेतात काम करीत असलेले नारायण सरडे (वय ५५) यांचेवर बिबट्याने अचानक हल्ला केला.

Leopards
आरोग्य विभागाचा पेपर विभागाच्या चुकीनेच फुटला

सरडे यांचा आरडा ओरड ऐकून जवळच असलेले नवनाथ भोंडवे त्यांच्या मदतीला आले आणि बिबट्या पळून गेला. सरडे यांना तात्काळ कोरेगाव-भिमा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले असता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद भोंडवे यांनी दिली. दरम्यान वाजेवाडीत गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वावरतो आहे. याबाबत आपण खासदार गिरीश बापट यांचे पत्रासह पिंजरा देण्याची मागणी केली होती. मात्र वनखात्याने याबाबत दूर्लक्ष केल्याने त्याचे परिणाम शेतक-यांना आता सोसावे लागत आहेत. यापुढील काळात तात्काळ पिंजरे न उपलब्ध केल्या थेट वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी उपसरपंच तथा बापट यांचे स्वीय सहायक अमित सोनवणे यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com