esakal | पावसाने ओढ दिल्याने भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाने ओढ दिल्याने भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पावसाने ओढ दिल्याने भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: जुलै महिना अर्ध्यावर आला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने हवेली भोर, वेल्हे,मावळ,मुळशी या तालुक्यांसह भातशेतीवर अवलंबून असलेल्या इतर तालुक्यांतील बळीराजाची चिंता वाढली आहे. लावणीसाठी तयार झालेली भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे.

पावसाने ओढ दिल्याने भाताची रोपे सुकण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी पाण्याअभावी रोपे जागेवरच जळून गेली आहेत. रोप टाकल्यापासून दरम्यानच्या काळात पुरेसे पाणी न मिळाल्याने रोपांची वाढही योग्य झालेली नाही. 25 ते 30 दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात परंतु सध्या हा कालावधी उलटून गेलेला असताना पावसाअभावी भातलावगड रखडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल,विहिर, शेततळे किंवा सिंचनाची इतर सुविधा उपलब्ध आहे अशा केवळ 10% क्षेत्रावर सध्या भातलागवड झाली आहे.

हेही वाचा: आईनंच बाळाला ५० हजाराला विकलं; अपहरणाचा बनाव उघडकीस

पुणे जिल्ह्यातील एकूण भात लागवडीखालील क्षेत्र-57,964 हेक्टर

सद्यस्थीतीत झालेली एकूण भात लागवड- 5579 हेक्टर

तालुकानिहाय झालेली भात लागवड(हेक्टर)

हवेली-23

मुळशी-243

भोर-3000

मावळ-60

वेल्हे-335

जुन्नर-350

खेड-1339

आंबेगाव-190

पुरंदर-39

हेही वाचा: "संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

"पाऊस वेळेवर न झाल्याने रोपांची वाढ झाली नाही. पाणी शिंपडून रोपं जगवली आहेत. अजूनही पाऊस कधी येईल हे सांगता येत नाही. मागील दोन वर्षे जास्त पाऊस झाल्याने पीक गेले. यावर्षी पावसाअभावी भातपीक जाते की काय अशी भीती वाटत आहे. जरी पाऊस झाला आणि भात लागवड केली तरी उशीर झाल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे."

- सुर्यकांत कदम, शेतकरी, नांदोशी-सणसनगर, हवेली.

" हवेली, वेल्हे,भोर,मुळशी येथील भातशेती पुर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने तेथील लागवड रखडली आहे.रोपांना फुटवे फुटण्याचा काळ उलटून गेला असल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड करताना जास्तीची रोपे लावावीत. कृषी विभागाकडून क्षेत्रभेटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे."

- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.

loading image