धक्कादायक! अंधाऱ्या रात्री दारूच्या नशेत पोटच्या पोराला बापाने सोडले रस्त्यावर 

father left his son on road due to alcohol in pune
father left his son on road due to alcohol in pune
Updated on

वारजे :  बापाला दारूचे व्यसन, त्यामुळे आई ही गेली घर सोडून. तरीही, दारूचे व्यसन सुरूच होते. त्यातच स्वतःच्या 10 वर्षाच्या पोराला दारुपाही अंधाऱ्या रात्री वारजे येथील उड्डाण पुलाखाली सोडून बाप निघून गेला. मुलगा याच पुलाखाली रडत बसला. वारजे पोलिसांनी त्याला विश्वासात घेत त्याला मदत केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीच्या ड्युटीवर होते. रिमझिम पाऊस सुरु होता. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगून गाडी घेऊन वारजे ब्रिजकडे निघाले असता एका कोपऱ्यात एक दहा वर्षाचा मुलगा रडत असताना दिसला. साधारणत: दहा वाजले असतील त्याच्याकडे गाडी घेऊन चौकशी केली असता. तो मुलगा पोलिसांना पाहून रडत होता. त्यावेळी त्यास विश्वासात घेऊन त्याला खायला देऊन त्याकडे विचारपूस केली. मुलाने सांगितले की, ''माझे नाव अमोल रामदास शिंदे (वय- 10 वर्ष, रा.  भूगाव,  पुणे) येथे माझ्या वडिलांसोबत राहावयास आहे. माझे वडील हे खूप दारू पीत असतात आज त्यांनीच मला इथे आणून सोडले व ते निघून गेले आहेत'' असे कळल्याने त्याची आई काय करते असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, माझी आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून घर सोडून आधीच निघून गेली आहे. त्यावेळी पोलिसांनी त्याला जवळ घेतले व बाळा काळजी करायची काही गरज नाही. आपण तुझ्या वडिलांना शोधू असे बोलून सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांना कळवून पोलीस शिपाई  रमेश चव्हाण, फिरोज शेख, सद्दाम शेख व ड्रायव्हर श्याम गावित यासह भूगाव येथे तो सांगेल त्या रस्त्याने पोलीस  गेले.

महत्त्वाची बातमी : पुणे जिल्ह्यातील `हा` भाग उद्यापासून सात दिवस राहणार बंद 

साधारण रात्रीचे बारा वाजता मुलाने दाखवलेल्या घराजवळ आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता समजले की, त्याचा बाप ती रूम सोडून केव्हाच निघून गेला आहे व त्याचे बाबतचे काही एक माहिती नाही. तो तिथे दारू पिऊन राहत असे. एक पत्र्याची रूम अशी ती जागा होती. त्यानंतर सदर परिसरामध्ये आणखीन काही ठिकाणी शोध घेतला पण, काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे नाईलाजाने त्या  मुलांला  घेऊन वारजेतील 'आपले घर' नावाची लहान मुलांची संगोपन करणारी संस्थेला कळवले. मात्र, कोरोनामुळे सध्या संस्थेचे कार्यालय बंद होते. ''आपण उद्या त्याला डोणजे या संस्थेत दाखल करून घेऊ. उद्या आपण त्याला माझ्याकडे घेऊन या'' असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे अमोल यास पोलीस स्टेशनला आणले व त्यास महिला पोलीस शिपाई यांच्या मदतीने रात्रभर तेथेच झोपी घातले. सकाळी नाष्टा  दिला. त्याची परिस्थितीबाबत  आणखीन आढावा घेतला असता तो वडिलांच्यात्रासामुळे एवढा त्रस्त होता की, त्याला त्याचा मूळ पत्ता देखील आठवत नव्हता. तो फक्त मुळगाव जळगाव रिसोड असेच सांगत होता. त्यानंतर त्यास पोलिसांनी कपडे व चप्पल घेऊन दिली. संस्थेच्या प्रमुख विजय फळणीकर यांच्याशी संपर्क केला व त्यास पुढील त्याचे आई-वडील भेटेपर्यंत डोणजे येथील 'आपले घर' या संस्थेत संगोपनासाठी पाठविले.

''आपल्या व्यसनापाई स्वतःच्या मुलाचा देखील विचार करू शकत नाही. अशां वर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.'' 

- अशोक येवले (  पोलीस उपनिरीक्षक वारजे माळवाडी )

Breaking : राज्य सरकारने रेडी-रेकनरच्या दरात केली वाढ; सर्वाधिक पुणे जिल्ह्यात तर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com