
पुणे - पालकांकडून शाळेचे शुल्क भरले जात नसल्याने शिक्षकांचे पगार, कर्जाचे हप्ते फेडणे आणि शाळा सुरू ठेवणे शक्य होत नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे. शाळा चालविणे अशक्य असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील चौदाशे 83 शाळा मंगळवारपासून तीन दिवसांसाठी बंद आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा मंगळवारी भरलीच नसल्याचे दिसून आले.
एकीकडे कोरानाच्या संकट काळात शाळांनी शुल्क वसुली करू नये, म्हणून पालक आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे पालक शुल्क भरत नसल्याचे शाळा चालविणे अशक्य असल्याचे सांगत शाळा बंद ठेवल्या जात आहेत. या सगळ्यात लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले जात असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे उघड आहे.
पालकांनी शाळांना शुल्क न दिल्यास शाळा सुरू ठेवणे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित पगार देणे याशिवाय अन्य खर्च करणे शाळा व्यवस्थापनाला शक्य होणार नाही, याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने "फि "फी नाही, शाळा नाही' अशी भूमिका मांडत शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळेचे शुल्क न दिल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याच्या तक्रारी पालक शिक्षण विभागाकडे सातत्याने करत आहेत. त्यावर कोरोना काळात पालकांचे रोजगार गेल्याने, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावल्याने शाळांनी शुल्क वसुलीसाठी तगादा लावू नये, असे राज्य सरकारमार्फत सांगण्यात आले आहे. परंतु पालकांनी शुल्क न भरल्यास शाळा चालविणे कठिण होईल, असे असोसिएशनचेच म्हणणे आहे. ""यंदा शाळांनी स्कुलबस, जेवण, कॉम्प्युटर लॅब, जिमखाना अशा सुविधांचे शुल्क घेतलेले नाही. त्याव्यतीरिक्त असलेले शुल्क पालकांना भरण्यास सांगितले जात आहे. तसेच पालकांना हप्त्यात शुल्क भरण्याची मुभा दिली जात आहे, असेही असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सांगितले.
""शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला, कारण आता इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण सुरू ठेवण्याची क्षमता संपत आहे. जवळपास 30 टक्के पालकांनी नियमितपणे शाळेचे शुल्क भरले आहे. तर काही उर्वरित पालकांच्या अडचणी समजून घेऊ, त्यांना हप्त्यात शुल्क भरण्याची मुभा दिली आहे. मात्र अजून 50 टक्क्यांहुन अधिक पालकांनी शुल्क अद्याप भरलेले नसल्याने शाळा सुरू ठेवणे कठिण आहे. पालकांविरोधी आमचे आंदालन नाही. तर शाळेचा विचार करून सक्षम पालकांनी शुल्क भरावे, असे म्हणणे आहे.''
- राजेंद्र सिंह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ स्कुल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.